
व्योहर-डेक्कन जिमखाना क्यु स्पोर्ट्स लीग
पुना क्लब, आरसीबीसी आणि कोरिंथियन क्लबच्या बिलीयर्डस् व स्नुकर हॉलमध्ये झालेल्या या साखळी लढतींमध्ये अत्यंत चुरशीचे निकाल पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात कोरिंथियन ग्लॅडिएटर्सने पुना क्लब मॅजिशियन्स्चा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पहिल्या डावात कोरिंथियनच्या राजिव लाल याने कपिल पंजाबीचा १५१-१४४ असा पराभव केला.
Duleep Trophy 2026: याच्यापेक्षा तर कासव बरं! 700 रन्सचा पाठलाग अन् Tilak Verma ची संथ खेळी
कोरिंथियन ग्लॅडिएटर्सचा निसटता विजय
पुना क्लबच्या विग्नेश संघवीने विराफ बोकदावाला याच्यावर ६२-१८ अशी सहज मात करत १-१ अशी बरोबरी साधली. दुहेरीच्या लढतीत कोरिंथियनच्या झुबिर शेख व विनीत पारकेरीया जोडीने अंगद सहानी व अनिल काकडे या जोडीचा ६२-४९ असा पाडाव केला. पुढील लढतीत पुना क्लबच्या दिनेश मेहतानीने सिध्दार्थ वर्माचा ४७-३५ असा पराभव करून संघाला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. निर्णायक सामन्यात कोरिंथियनच्या रजत फरसवालने अव्वल मानांकित सुरज राठीचा ७३-२९ असा पराभव करत अनपेक्षित निकालासह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
परतीच्या सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स्ने अप्रतिम पुनरागमन केले. त्यांनी कोरिंथियन ग्लॅडिएटर्सचा ३-२ असा पराभव करून आधीच्या पराभवाचा वचपा काढला. पुना क्लबकडून सुरज राठी, विग्नेश संघवी आणि कपिल पंजाबी यांनी निर्णायक क्षणी वैयक्तिक सामने जिंकून संघाला यश मिळवून दिले.
Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
आरसीबीसी लेजंड्स संघाने आरसीबीसी ऑल स्टार्सविरुद्ध घरच्या आणि परतीच्या दोन्ही लढतींमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. पहिल्या सामन्यात ५-० आणि परतीच्या लढतीत ४-१ असा दणदणीत विजय मिळवून त्यांनी सलग दोन विजयांची नोंद केली. संघाकडून ऋषी रामय्या, विजय नचानी, पंकज सहानी, झुबिन रजिस्ट्रार आणि झकील पटेल यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.