Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada News: मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! लोअर परळ बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना ६ नोव्हेंबरला हक्काची घरे

Mhada News: मुंबईतील ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2026 | 11:33 AM
मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! लोअर परळ बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना ६ नोव्हेंबरला हक्काची घरे

मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! लोअर परळ बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना ६ नोव्हेंबरला हक्काची घरे

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार!
  • लोअर परळ बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना ६ नोव्हेंबरला हक्काची घरे
  • देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ५५७ सदनिकांचे वितरण
Mhada News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील ५५७ पात्र रहिवाशांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या तीन पुनर्वसन इमारतींमधील ५५७ सदनिकांचे वितरण ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.(Mhada News)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील १३.४९ एकर जागेवर तळ अधिक तीन मजल्यांच्या ३२ चाळी होत्या. या चाळींमध्ये १६० चौरस फुटांच्या सदनिकांमध्ये २ हजार ५६० निवासी आणि अनिवासी गाळेधारक वास्तव्यास होते.

दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना आता ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या प्रशस्त २ बीएचके सदनिका मोफत मालकी हक्काने मिळणार आहेत. नव्या सदनिकांमध्ये व्हिट्रीफाईड टाइल्स, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रॅनाइटचा स्वयंपाकघरातील ओटा, अग्निरोधक यंत्रणा आणि ब्रँडेड प्लंबिंग फिटिंग्स अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

भूकंपरोधक तंत्रज्ञानावर आधारित या इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट आणि एक फायर लिफ्ट बसविण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणाही उभारण्यात आली आहे. याशिवाय तीन मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया, एक पोडियम आणि प्रशस्त जिन्यांची सुविधा देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात ७ विंग आणि हॉस्पिटल इमारतीचा समावेश

दोन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पात २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारतींच्या एकूण १४ विंग उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात सात विंग आणि एका हॉस्पिटल इमारतीचा समावेश आहे. त्यापैकी तीन विंगमधील ५५७ सदनिकांचे वितरण ६ नोव्हेंबरला होणार आहे. उर्वरित चार विंगमधील ६८४ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. या बांधकामासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी सुमारे ६५ टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील १२०० गाळेधारकांची पात्रता निश्चित

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १५ चाळींमधील १२०० बीडीडी चाळ गाळेधारकांची अंतिम पात्रता निश्चित करण्यात आली आहे. चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑगस्ट २०२६ पासून निवासी आणि अनिवासी गाळेधारकांना दरमहा ३० हजार रुपये याप्रमाणे ११ महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत स्वयंपूर्ण वसाहत उभारण्यात येणार आहे. यामध्ये स्वतंत्र वेल्फेअर सेंटर, हॉस्पिटल, मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली आणि पर्जन्यजल संचयन यांसारख्या सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. पुनर्वसित इमारतींच्या सामायिक सुविधांची १२ वर्षे म्हाडामार्फत देखभाल केली जाणार आहे.

लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था

सदनिका वितरण सोहळा लाभार्थ्यांना घरबसल्या पाहता यावा, यासाठी म्हाडाच्या अधिकृत YouTube आणि Facebook चॅनलवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रकल्पस्थळी पुनर्वसन इमारतींच्या आवारात विशेष मंडप उभारण्यात येणार असून सुमारे ५०० नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

मोठ्या एलईडी पडद्यांवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. पात्र कुटुंबातील एका सदस्याला कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशिका ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील साईट ऑफिसवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवेशिका धारक लाभार्थ्यांसाठी संक्रमण शिबिरापासून कार्यक्रमस्थळापर्यंत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.

वरळी आणि नायगावमध्येही सदनिकांचे वितरण

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी येथे १४ ऑगस्ट २०२५ रोजी पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांचे वितरण करण्यात आले. २२ मे २०२६ रोजी ८२७ सदनिकांचे, तर १० सप्टेंबर २०२६ पासून बी आणि सी विंगमधील ५७० सदनिकांचे लोकार्पण करण्यात आले. वरळीमध्ये आतापर्यंत एकूण १९७५ पुनर्वसन सदनिकांचे लोकार्पण झाले आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १६ मार्च २०२६ रोजी ८६४ सदनिकांचे, तर ५ जून २०२६ रोजी ५३७ सदनिकांचे वितरण करण्यात आले. नायगावमध्ये एकूण १४०१ पुनर्वसन सदनिकांचे लोकार्पण झाले आहे.

MHADA Lottery Results: म्हाडा सोडतीचा मोठा दिवस! 2,640 सदनिकांचा निकाल घरबसल्या LIVE पाहा

मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ आणि नायगाव येथील सुमारे ८६ एकर जागेवर पसरलेल्या १९५ चाळींचा या प्रकल्पात समावेश आहे. या माध्यमातून १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. वरळी येथे ९६८९ निवासी आणि अनिवासी गाळ्यांसाठी ३४ पुनर्वसन इमारती, नायगाव येथे ३३४४ गाळ्यांसाठी २० पुनर्वसन इमारती, तर लोअर परळ येथे २५६० गाळ्यांसाठी १४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे मुंबईतील जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांना आधुनिक आणि सुरक्षित घरांचा लाभ मिळणार आहे. लोअर परळमधील ५५७ सदनिकांचे वितरण हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ सदनिकांचे वितरण कधी होणार आहे?

    Ans: ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

  • Que: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना किती क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे?

    Ans: पात्र रहिवाशांना ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सर्व सोयीसुविधांनी युक्त २ बीएचके सदनिका मोफत मालकी हक्काने मिळणार आहे.

  • Que: लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एकूण किती सदनिका आहेत?

    Ans: ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ प्रकल्पात एकूण २ हजार ५६० निवासी आणि अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत.

Web Title: Bdd chawl redevelopment lower parel 557 flats distribution devendra fadnavis november 6 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • mhada
  • MHADA Houses
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास
1

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास

ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; सागर डॅशला अटक, मुंबई कनेक्शनची चौकशी सुरू
2

ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; सागर डॅशला अटक, मुंबई कनेक्शनची चौकशी सुरू

Nanded News :- नांदेडमध्ये वाडी रुग्णालयाचे लोकार्पण; शेतकऱ्यांना मदतीचे वाटप…
3

Nanded News :- नांदेडमध्ये वाडी रुग्णालयाचे लोकार्पण; शेतकऱ्यांना मदतीचे वाटप…

Maharashtra Tax Devolution Diwali: दिवाळीपूर्वी केंद्राकडून राज्याला मिळाला ७.०२२ कोटींचा निधी
4

Maharashtra Tax Devolution Diwali: दिवाळीपूर्वी केंद्राकडून राज्याला मिळाला ७.०२२ कोटींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.