Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पना राज्यभर राबविणार; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

होळ येथे उभारण्यात आलेले मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्यासाठी दिशादर्शक ठरणारे असून, ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2026 | 04:16 PM
प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पना राज्यभर राबविणार; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पना राज्यभर राबविणार; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यातील होळ येथे उभारण्यात आलेले मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्यासाठी दिशादर्शक ठरणारे असून, ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. होळ येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सक्षम आणि आधुनिक आरोग्य सुविधा उभारण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिल्याचे सांगितले. होळ येथील अत्याधुनिक केंद्रामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाला नवी दिशा मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

 

लोकसहभागातून आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, ई-संजीवनीसारख्या विविध उपक्रमांद्वारे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एकाच वेळी लोकार्पण करण्यात आले. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत.

येत्या काळात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना मॉडेल स्वरूप देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भरतीस परवानगीची मागणी

पुणे जिल्हा परिषद विविध मानांकनांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी कार्यरत असून, मागील वर्षी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल ४९ लाख ओपीडी नोंदविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एएनएम भरतीस परवानगी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य

सुविधांची पाहणी, मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमात मान्यवरांनी मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची पाहणी केली. यावेळी ‘मॉडेल पीएचसी’ आणि ‘प्रोजेक्ट सेव्ह’ या उपक्रमांवरील चित्रफिती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती दिपाली हुलावळे, महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, सदस्य करण खलाटे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, भारत फोर्जचे उपाध्यक्ष सदाशिव लोखंडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अभिषेक जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Minister prakash abitkar said that the primary health center concept will be implemented across the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Prakash Abitkar
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.