Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 02:59 PM
भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक

भामा- आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘अल्टिमेटम’; भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन भामा आसखेड पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जानेवारी-२०२७ चा ‘अल्टिमेटम’ महापालिका प्रशासनाला दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्धारित वेळेत प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी माहिती भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सत्तारुढ पक्षनेता प्रशांत शितोळे, मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आणि आगामी कामांची तातडीने गती मिळविण्यासाठी उपाययोजना निश्चित केल्या आहेत.

या योजेतील भामा आसखेड जलउपसा केंद्रावर काम प्रगतीवर आहे. जॅकवेल – १००% पूर्ण झाले आहे. पंप हाऊस – ७५%, सबस्टेशन – ८०%, अप्रोच ब्रिज –५% आणि विद्युत, यांत्रिकी, Instrumentation, SCADA साहित्य – १००% उपलब्ध झाले आहेत.

रावेत आणि निघोजे बंधारा प्रदूषणावर उपायोजना करा

शहराला पाणी उपसा करणाऱ्या दोन्ही बंधाऱ्यातील पाणी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत आपण विधानसभा सभागृहातही मंत्रीमहोदय यांचे लक्ष वेधले आहे. पुरवठा होणारे पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पाणी प्रक्रिया यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सेकंडरी ट्रिटमेंटनंतर आता टर्शरी ट्रिटमेंट करावी लागणार आहे. त्याठिकाणी ड्रेनेजचा वास येतो. त्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. तसेच, निगडी ऑग्युमेंन्टेशन टप्पा दोनचे काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. निगडी WTP – ४२८ MLD (१०० MLD वाढ, एकूण ५२८ MLD) कामाला गती द्यावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.

ठेकेदार बदला किंवा नवीन घ्या, पण काम वेळेतच झाले पाहिजे..!

भामा आसखेड धरण येथील अशुद्ध जलउपसा केंद्र पासून नवलाख उंबरे येथील बी.पी.टी पर्यंत १७०० मि.मी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाचा ठेकेदार – मे. ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम केलेले नाही. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सदर ठेकेदाराचे काम रद्द केले आहे. नवीन निविदा काढणे किंवा न काढणे हा प्रशासनाचा अधिकार आहे. पण, या प्रकल्पाचे काम निश्चित वेळेत झाले पाहिजे. त्यासाठी संबंधित ठेकेदार याला जाचक अटी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नमूद करा. भामा आसखेड प्रकल्पातून सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत ट्रायल चालू झाली पाहिजे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालू करुन जानेवारी २०२७ मध्ये मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण झाले पाहिजे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.

“पिंपरी-चिंचवडच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील अनुभवी अधिकारी आणि महापालिका अस्थापनेवर असणारा अधिकारी भूसंपादन व विविध परवानग्यांसाठी पूर्णवेळ नियुक्त केला पाहिजे. तशी सूचना प्रशासनाला केली आहे. आंद्रा-भामा आसखेड पाणी योजना पिंपरी-चिंचवडसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जानेवारी- २०२७ मध्ये कोणत्याही परिस्थितीत पूर्ण क्षमतेने योजना सुरू होईल. या करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत आहोत. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Web Title: Mla mahesh landage has held an important meeting regarding bhama askhed water supply scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • BJP
  • mahesh landage
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश
1

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
2

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
3

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’
4

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.