Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळात एमडी पावडरचा वाढता विळखा, अमली पदार्थ येतात तरी कुठून? आमदार सुनील शेळकेंचा संताप

एमडी (मेफेड्रोन) सारखे अमली पदार्थ मावळमध्ये येतात तरी कुठून? आणि यासाठी जबाबदार कोण? असा थेट सवाल आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 02:18 PM
मावळात एमडी पावडरचा वाढता विळखा, अमली पदार्थ येतात तरी कुठून? आमदार सुनील शेळकेंचा संताप

मावळात एमडी पावडरचा वाढता विळखा, अमली पदार्थ येतात तरी कुठून? आमदार सुनील शेळकेंचा संताप

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/सतिश गाडे : पुणे जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने बारामतीनंतर मावळ तालुक्याचे नाव घेतले जाते, ही बाब अभिमानास्पद असली तरी तालुक्यातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यामुळे भविष्यात सामाजिक व कायदेशीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. एमडी (मेफेड्रोन) सारखे अमली पदार्थ मावळमध्ये येतात तरी कुठून? आणि यासाठी जबाबदार कोण? असा थेट सवाल आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिटी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

या बैठकीला जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बबनराव भेगडे काळूराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, महादू कालेकर, सुरेश धोत्रे, दीपक हुलावळे,, साहेबराव कारके, दिलीप ढोरे, जिल्हा परिषद सदस्या दिपाली हुळावले नगराध्यक्ष अबोली ढोरे यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आमदार शेळके यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांत तालुक्याचे वातावरण शांत असले तरी निवडणुकीतील संघर्ष वैचारिक असावा. मात्र सध्या मावळसमोरील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वाढते व्यसनाधीनता व अवैध धंदे हा आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि वेगाने वाढणारा तालुका असलेल्या मावळमध्ये प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

“दहा घरांमागे एका घरातील व्यक्ती व्यसनाधीन होत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कुटुंबांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे. महामार्गावर वाढणारा वेश्याव्यवसाय थांबवणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच तालुक्यातील दलाली प्रथा मोडीत काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पानटपऱ्यांवर एमडी पावडर, मावा, गुटखा यांची खुलेआम विक्री होत असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, या पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असून, ही परिस्थिती समाजासाठी धोकादायक ठरत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केवळ पोलिस प्रशासन नव्हे, तर लोकप्रतिनिधी आणि समाजानेही पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

वडगावमध्ये उभारणार अजितदादांचे स्मारक

बैठकीदरम्यान तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी मावळ तालुक्यात अजितदादांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली. यावर आमदार शेळके यांनी वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त केला.

…असं चालणार नाही – गणेश खांडगे

निवडणुकीत विजयी उमेदवारांबाबत पक्षात मतभेद होत असून, काहीजण संघटनेला किंमत देत नाहीत. मात्र अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी भरुन ठेवा! आज सायंकाळी पाणीपुरवठा राहणार बंद

कार्यकर्त्यांना न्याय मिळेल – विठ्ठल शिंदे

पक्ष संघटना हीच विजयाची ताकद असून कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्ष उभा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Mla sunil shelke has raised a question due to the increase in the amount of drugs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Drugs
  • maval news
  • Sunil Shelke

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.