Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दगडूशेठचा ‘श्रीमंत’ थाट; 51 लाख फुलांत नटला लाडका गणपती बाप्पा

गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे परिधान करण्यात आली होती. तसेच चांदीच्या मूर्तीला वासंतिक उटीचे लेपनही करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 09:52 PM
दगडूशेठचा 'श्रीमंत' थाट; 51 लाख फुलांत नटला लाडका गणपती बाप्पा

दगडूशेठचा 'श्रीमंत' थाट; 51 लाख फुलांत नटला लाडका गणपती बाप्पा

Follow Us
Close
Follow Us:

५१ लाख फुलांत नटला ‘दगडूशेठ’ गणराया
भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने उजळून निघाला परिसर 
 गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdusheth Halwai Ganesh Temple) व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सवानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर ५१ लाख सुवासिक व विविधरंगी फुलांनी सजविण्यात आले. मोगरा, लिली, झेंडू, गुलाब, जास्वंद, चाफा, शेवंती, गुलछडी, कमळ, जाई-जुई आदी फुलांच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने उजळून निघाला.

मोगरा महोत्सवानिमित्त फुलांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. गाभारा आणि सभामंडपातील रंगीबेरंगी पुष्पसजावटीमुळे गणरायाला जणू फुलांचे अर्घ्य अर्पण केल्याचा भास होत होता. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे परिधान करण्यात आली होती. तसेच चांदीच्या मूर्तीला वासंतिक उटीचे लेपनही करण्यात आले.

या प्रसंगी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, यंदाच्या पुष्पसजावटीसाठी कारागिरांनी दोन दिवसांपासून मेहनत घेतली होती. मंदिरातील देखणी सजावट आणि गणरायाचे लोभस रूप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांची विशेष उत्सुकता दिसून आली.

थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये ‘दगडूशेट गणपती’ मंदिराची प्रतिकृती; भारतीयांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी

मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे सादर करण्यात आले. भक्ती, सुगंध आणि फुलांच्या देखण्या साजाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात अविस्मरणीय आध्यात्मिक सोहळा अनुभवायला मिळाला.

थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका

थायलंडमधील निसर्गरम्य फुकेत येथे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकारला आहे. दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या ‘एसक्युसीसी प्रॉपर्टीज एलएलसी’ ( SQCC Properties LLC) दुबई, (UAE) आणि ‘फुकेत ९ रियल इस्टेट डेव्हलपमेंट’, थायलंड (Phuket9 Real Estate Development, Thailand) यांच्या संयुक्त विद्यमाने फुकेतमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. फुकेतच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यालगत, शांत आणि निसर्गसंपन्न परिसरात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे भारतीय गुंतवणूकदारांसाठी परदेशात स्वतःची प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

Web Title: Moga festival in dagdusheth halwai ganesh temple pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • dagdusheth halwai
  • Ganesh Temple
  • pune news

संबंधित बातम्या

Pune : व्हीआयपींच्या वाढत्या दौऱ्यांमुळे पुणे पोलिसांची दमछाक! गुन्हे शाखाही बंदोबस्तात
1

Pune : व्हीआयपींच्या वाढत्या दौऱ्यांमुळे पुणे पोलिसांची दमछाक! गुन्हे शाखाही बंदोबस्तात

घुंमगराच्या तालात नव्या युगाची चाहूल, नृत्यसंस्कृतीला नवा आयाम; कथ्थक ते फ्युजनपर्यंत तरुणाईचा वाढतोय कल
2

घुंमगराच्या तालात नव्या युगाची चाहूल, नृत्यसंस्कृतीला नवा आयाम; कथ्थक ते फ्युजनपर्यंत तरुणाईचा वाढतोय कल

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
3

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Pune News : सामाजिक सलोख्याचा पुण्यातून निर्धार ! परवानगीशिवाय पुतळे बसवले जाऊ नयेत !
4

Pune News : सामाजिक सलोख्याचा पुण्यातून निर्धार ! परवानगीशिवाय पुतळे बसवले जाऊ नयेत !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.