थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये 'दगडूशेट गणपती' मंदिराची प्रतिकृती (Photo Credit- X)
मुंबईतील सहार येथील JW Marriott हॉटेलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ‘Phuket9’ च्या संस्थापक सौमिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
फुकेतमध्ये उभारण्यात आलेल्या ‘दगडूशेट गणपती’ मंदिराच्या प्रतिकृतीमागील कथा देखील तितकीच प्रेरणादायी आहे. युरोपियन नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या या शांत आणि रम्य ठिकाणी भेट दिल्यानंतर डॉ. मांजरेकर यांनी या मंदिरातील शोडोपचार पूजा, आरती आणि भजन यामध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग पाहून आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, या मंदिराची निर्मिती मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) यांच्या वडिलांनी केली असून, त्या स्वतः या मंदिराची सेवा करतात. भारतीय संस्कृतीबद्दल असलेले त्यांचे प्रेम लक्षात घेऊन डॉ. मांजरेकर यांनी भारतीयांसाठी फुकेतमध्ये प्रॉपर्टी खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.
‘Phuket9’ ही कंपनी 2004 पासून फुकेतमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून, विकास, बांधकाम आणि व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हॉटेल्स, कॉन्डोमिनियम्स आणि लक्झरी व्हिला यांचा समावेश असून सर्व प्रकल्पांसाठी व्यावसायिक प्रॉपर्टी मॅनेजमेंट सुविधा दिल्या जातात.
या प्रसंगी बोलताना मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) म्हणाल्या, “आमचे ध्येय म्हणजे आमच्या ग्राहक, भागीदार आणि आमच्या टीमसाठी एक मजबूत आणि स्थिर संस्था उभी करणे. या दृष्टीकोनामुळे अधिकाधिक सकारात्मक विचारांचे लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आम्हाला आमच्या मुख्य कार्यालयात आपले वैयक्तिक स्वागत करण्यास नेहमीच आनंद वाटतो. फुकेत येथे आपले हार्दिक स्वागत आहे!”
यावेळी डॉ. सुनील व्ही. मांजरेकर म्हणाले, “फुकेत ही केवळ पर्यटनस्थळ नाही, तर भारतीयांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचे नवे केंद्र आहे. मराठी संस्कृतीची जोड आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हा प्रकल्प गुंतवणूकदारांसाठी विशेष ठरेल.”
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यात सातत्याने वाढ करण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय मानली जाते. वाढता पर्यटन व्यवसाय, मर्यादित जमीन उपलब्धता आणि नियोजित विकासामुळे फुकेतमधील मालमत्ता बाजार सातत्याने बळकट होत आहे.
Phuket9 चा फुल-सायकल अॅप्रोच हा या प्रकल्पाचा मुख्य आधार असून, सखोल मार्केट रिसर्चपासून ते टर्नकी डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापनापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर आणि विश्वासार्ह परतावा मिळण्यास मदत होते. कंपनीकडून मोफत कन्सल्टेशन सेवा उपलब्ध असून, ग्राहकांना योग्य मालमत्ता निवडण्यासाठी तसेच वैयक्तिक प्रोजेक्ट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले जाते.






