Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरणचा वीजचोरांना दणका; राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड

वीजचोरी आणि महसूल गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक परिक्षेत्रात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून तपासणी करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2026 | 11:00 AM
महावितरणचा वीजचोरांना दणका; राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड

महावितरणचा वीजचोरांना दणका; राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड

Follow Us
Follow Us:
  • तीन दिवसांत राज्यभर २५० वीजचोरीची प्रकरणे उघडकीस
  • कारवाईत ६ कोटी २७ लाख रुपयांची वीजचोरी उघड
  • देयक व दंड न भरल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
बारामती : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राज्यात अवघ्या तिनच दिवसात राबविलेल्या वीज चोरी मोहीमेत वीज चोरी व अनधिकृत वीज वापराची २५० प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत ६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.

वीजचोरी आणि महसूल गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक परिक्षेत्रात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात ५३, पुणे ७३, छत्रपती संभाजीनगर ५६ आणि नागपूर प्रादेशिक विभागात ६८ अशा एकूण २५० वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. वीज चोरी प्रकरणांचे मुल्यांकन झाले असून ६ कोटी २७ लाख रूपयांच्या वीज चोरीचे बिल संबंधित ग्राहकांना देण्यात आले आहे. वीज चोरीचे देयक व दंडाचा भरणा न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेत २४० ग्राहकांविरुद्ध विदयुत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर कलम १२६ नुसार अनधिकृत वीज वापर प्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा विहित मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

वीजजोडण्यांची तपासणी सुरू

सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.

FAQ

प्रश्न १ : महावितरणच्या मोहिमेत किती वीजचोरीची प्रकरणे सापडली?
उत्तर : राज्यभरात तीन दिवसांत वीजचोरी व अनधिकृत वीज वापराची २५० प्रकरणे उघडकीस आली.

प्रश्न २ : किती रुपयांची वीजचोरी उघड झाली?
उत्तर : एकूण ६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाला.

प्रश्न ३ : सर्वाधिक प्रकरणे कोणत्या विभागात सापडली?
उत्तर : पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७३ प्रकरणे आढळली.

Web Title: Msedcl cracks down on electricity thieves 250 cases of power theft cases nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • baramati news
  • MSEDCL

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?
1

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
2

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!
3

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

Baramati News : नीरा नदीत पाणी सोडण्यास छत्रपती, सोमेश्वर, माळेगावचा विरोध; पृथ्वीराज जाचकांचा आंदोलनाचा इशारा
4

Baramati News : नीरा नदीत पाणी सोडण्यास छत्रपती, सोमेश्वर, माळेगावचा विरोध; पृथ्वीराज जाचकांचा आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.