
MSEDCL Abhay Yojana 2026 27, Mahavitaran Abhay Yojana Baramati, Electricity Bill Interest Waiver Maharashtra,
महावितरणने ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू केली आहे. बारामती परिमंडलातील बारामती, सोलापूर आणि सातारा या तीन मंडलांमधील पात्र ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये १५७ उच्चदाब ग्राहकांकडे सुमारे ८३.६३ कोटी रुपये, तर २ लाख ८१ हजार २२४ लघुदाब व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९०.३२ कोटी रुपयांची मूळ थकबाकी आहे.
Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!
बारामती मंडलातील ६६ हजार ६३४ ग्राहकांकडे १२८.२६ कोटी रुपयांची मूळ थकबाकी असून, त्यावरील १७.८१ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहेत. सोलापूर मंडलातील १ लाख ५८ हजार १० ग्राहकांकडे १०६.२३ कोटी रुपयांची मूळ थकबाकी असून, १६.४१ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होतील. सातारा मंडलातील ५६ हजार ७३७ ग्राहकांकडे ३९.४६ कोटी रुपयांची मूळ थकबाकी असून, ४.३६ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांच्या थकबाकीवरील १०० टक्के विलंब आकार आणि व्याज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच, मूळ थकबाकीच्या कालावधीनुसार ग्राहकांना १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देय मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. यालाच ‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह’ असे संबोधण्यात आले आहे. मात्र, हप्त्यांमध्ये भरणा करणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकीवरील ही सवलत मिळणार नाही.
एकरकमी भरणा करणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. लघुदाब ग्राहकांना मूळ थकबाकीच्या किमान ५० टक्के रकमेचा भरणा करून उर्वरित रक्कम सहा समान व सलग मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल. उच्चदाब ग्राहकांना थकबाकी ५० लाख रुपयांपर्यंत असल्यास उर्वरित रक्कम कमाल तीन मासिक हप्त्यांत, तर ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास कमाल सहा मासिक हप्त्यांत भरता येईल.
विशेष म्हणजे, २० किलोवॅटपर्यंत जोडभार असलेल्या पात्र ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटर स्वीकारल्यास देय मूळ थकबाकीवर आणखी पाच टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. योजनेअंतर्गत उच्चदाब व लघुदाब ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क, तसेच लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे आवश्यक हमीपत्र व कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. कोणताही वाद, न्यायालयीन प्रकरण किंवा बिलिंग तक्रार प्रलंबित असलेल्या ग्राहकांना संबंधित प्रकरण बिनशर्त मागे घेतल्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल.
बारामती परिमंडलातील पात्र ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन आपली थकबाकी निकाली काढावी आणि पुन्हा वीजजोडणी घेऊन वीजपुरवठा सुरू करून घ्यावा. विशेषतः २० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ डिसेंबरपूर्वी एकरकमी भरणा करावा. योजनेची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२७ असल्याने ग्राहकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.
१५ डिसेंबरपर्यंत भरणा करा, मिळवा २० टक्क्यांपर्यंत सवलत
महावितरणच्या अभय योजनेत पात्र ग्राहकांना मूळ थकबाकीच्या कालावधीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या विशेष ‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह’चा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देय मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे.
“अभय योजना ही थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त होण्याची आणि पुन्हा वीजजोडणी घेण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. थकबाकीवरील १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ होणार असून, मूळ थकबाकीवरही २० टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध आहे. एकरकमी भरणा शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी व्याजमुक्त हप्त्यांची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे बारामती परिमंडलातील सर्व पात्र ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन आपली थकबाकी निकाली काढावी.”