Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMPML म्हणजे ‘बदल्यांचे आगार’; ६ वर्षांत ८ अध्यक्ष बदलले, IAS पंकज देवरेंची उचलबांगडी

योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे संकेत यावर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतुदीवरून मिळत आहेत. सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ १.४८ कोटी लाभार्थ्यांसाठी २६,५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 12:58 PM
PMPML Chairman Transfer, Pune PMPML News Today,

PMPML Chairman Transfer, Pune PMPML News Today,

Follow Us
Follow Us:
  • PMPML च्या अध्यक्षपदावर पुन्हा एकदा खांदेपालट
  • महेश आव्हाड पीएमपीचे नवे ‘सारथी’
  • कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील कथित अनियमिततेच्या आरोपानंतर त्यांची बदली
 

PMPML chairman transfers in last six years: पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आयएएस पंकज देवरे यांची बदली कऱण्यात आली आहे. पंकज देवरे यांच्याकडील अध्यक्षपदाची सुत्रे आता आयएएस महेश आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात पीएमपीच्या अध्यक्षपदावर नियुक्त झालेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. मागील सहा वर्षात तब्बल आठ अध्यक्षांची नियुक्ती आणि बदली करण्यात आली आहे.

पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष IAS महेश आव्हाड यापूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या सीईओपदावर कार्यरत होते. त्या पदावरून बदली करून त्यांच्याकडे आता पीएमपीच्या अध्यक्षपद देण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जुलै २०२५ मध्ये पंकज भोयर यांना पीएमपीच्या अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली होती. पण अवघ्या ९ महिन्यांतच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

पुणे पोलिस अन् महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 8 दिवसात…

पीएमपीची कामाची पद्धत, रचना आणि प्रवाशांच्या समस्यांची माहिती करून घेण्यासाठीच अध्यक्षांना काही महिन्यांचा काळ लागतो. पण पंकज देवरे यांच्याकडे पीएमपीची सुत्रे आल्यानंतर काही दिवसांतच पीएमपीच्या काम मोठ्या वेगाने सुरू झाले होते. पण मध्येच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण आता त्यांच्या या बदलीमुळेपीएमपीच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर अध्यक्ष IAS महेश आव्हाड हे आज (12 मार्च) आपला पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे.

अल्पायुषी कार्यकाळ आणि प्रशासकीय बदल:

पंकज देवरे यांची उचलबांगडी: मागील वर्षी जुलैच्या मध्यात पंकज देवरे यांनी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे.

३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यात अडथळे: २०११ मध्ये नियुक्त झालेले आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता, गेल्या १९ वर्षांत एकाही अधिकाऱ्याला या पदावर आपला ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. दीपा मुधोळ-मुंडे, पंकज देवरे आणि इतर अनेक अधिकारी पीएमपी परिवहन संस्थेत आपला कार्यकाळ पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.

स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळणार की नाही? अधिकृत नियुक्तीआधीच स्थायी समिती अंदाजपत्रक मांडण्याची शक्यता

१९ वर्षांत २२ पेक्षा अधिक अध्यक्ष:

पीएमपीएमएलच्या स्थापनेपासूनच्या १९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २१ पेक्षा जास्त अध्यक्षांची बदली झाली आहे. पंकज देवरे हे या पदावर बसणारे २२ वे अधिकारी होते, तर आता महेश आव्हाड यांच्या रूपाने संस्थेला २३ वे अध्यक्ष मिळाले आहेत.

आर्थिक पाहणी अहवालातील धोक्याची घंटा:

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात पीएमपीच्या स्थितीबाबत चिंताजनक चित्र मांडण्यात आले आहे. बसेसची कमतरता आणि प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे ही संस्था आर्थिक संकटात सापडली आहे. वारंवार होणाऱ्या अध्यक्षांच्या बदल्यांमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास अडथळे येत असून, त्याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Musical chairs in pmpml 8 chairmen in 6 years as pankaj devre transferred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • e-KYC
  • Ladki Bahin Yojna
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
2

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी
3

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम
4

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.