Pune Corporation Budget: चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवणार? 'मविआ'चा हायकोर्टात जाण्याचा इशारा
पुणे: महापािलकेचे अंदाजपत्रकासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरणार आहे. या वक्तव्याचा आधार घेत महाविकास आघाडीने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या माजीनगरसेवक, आमदार , पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या कामांच्या यादीचा आगामी अंदाजपत्रकात समावेश केला जाण्यासंदर्भात पाटील यांनी नुकतेच वक्तव्य केले हाेते.
महापािलकेचे आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले हे तयार करीत आहे. या संदर्भातील बैठका त्यांनी विधान भवन येथे घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाली. या अंदाजपत्रकात भाजपचा वरचष्मा राहील, भाजपच्या माजी नगरसेवकांनी सुचविलेल्या तसेच आमदारांनी सुचविलेल्या कामांसाठी तरतुदी केल्या जातील अशी चर्चा सुरु झाली.
दरम्यान, नुकतेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यशाळेत ‘‘ मी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांकडे बसून विधानसभा निहाय निधीचा कोटा निश्चित केला आहे. आयुक्तांकडे कामांच्या याद्या दिल्या आहेत. या कामांचा समावेश महापालिकेच्या अंदाजपत्रकात होईल, याची खात्री आम्ही दोघेही दररोज करीत आहोत,’’ असे वक्तव्य केले हाेते. त्याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहे.
हेही वाचा: Sangli News: सांगलीत पत्रकारावर हल्ल्याचे प्रकरण: गुन्हेगारांवर थेट…; चंद्रकांत पाटलांचा दणका
मंगळवारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त डाॅ. भाेसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दाेडके, शिवसेनेचे ( ठाकरे गट) शहरप्रमुख संजय माेरे, गजानन थरकुडे, समन्वयक वसंत माेरे, अशाेक हरणावळ, माजी आमदार रवींद्र धंगेकर आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आयुक्त डाॅ. भाेसले यांच्याकडे आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक हे पारदर्शी असावे, सत्ताधारी भाजपच्या लाेकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश करायचा असेल तर इतर पक्षाच्या माजी नगरसेवक, लाेकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश करावा. यासाठी आम्ही कामाच्या याद्या देऊ अन्यथा उच्च न्यायलयात आम्ही दाद मागू असा इशारा दिला आहे. आयुक्त भाेसले यांची भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळाने पत्रकार परीषदेत भुमिका स्पष्ट केली. आयुक्त भाेसले यांनी देखील काेणाच्याही राजकीय दबावाला मी बळी पडणार नसल्याचे सांगितल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
‘‘ यापुर्वी २००८ साली आमदारांनी सुचविलेल्या कामांसाठी प्रथमच तरतुद केली गेली. परंतु ती जास्त नव्हती. सध्या मात्र चुकीचा पायंडा पाडला जात आहे. त्याविराेधात आंदोलन करावे लागणार आहे. या अंदाजपत्रकात महायुतीमधील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसलाही डावलले जात अाहे’’ प्रशांत जगताप (शहराध्यक्ष : राष्ट्रवादी काॅंग्रेस – शरद पवार गट)
हेही वाचा: Pune Metro News: पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?
‘‘ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यशाळेत केलेल्या विधानामुळे महापािलकेच्या अंदाजपत्रकात भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले अाहे. वास्तविक सर्वांना न्याय दिला पाहीजे. अन्यायकारक अंदाजपत्रक सादर झाले तर त्याविराेधात आंदोलन करावे लागेल’’-संजय माेरे ( शहर प्रमुख – शिवसेना ठाकरे गट )