Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Animal Health : उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता

खेड तालुक्यासह चास वाडा परिसरात सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 10, 2026 | 12:30 AM
उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता

उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

चास वाडा : खेड तालुक्यासह चास वाडा परिसरात सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. दूध देणाऱ्या जनावरांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

 

सध्या दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. गोठ्यांमध्ये पुरेशी हवेशीर व्यवस्था नसलेल्या ठिकाणी जनावरांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सावलीची व्यवस्था अपुरी असल्याने तसेच झाडांची कमतरता असल्यामुळे जनावरे कडक उन्हातच उभी राहतात. परिणामी त्यांना उष्माघात, भूक मंदावणे, अशक्तपणा आणि दूध उत्पादन घटणे अशा समस्या उद्भवत आहेत. विशेषतः दुधाळ गायी व म्हशींना उष्णतेचा अधिक परिणाम होत आहे. दूध उत्पादनात घट होत असल्याची तक्रार काही पशुपालकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच दुपारच्या कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेले जात असल्याने त्यांना उष्माघाताचा धोका अधिक वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात जनावरांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. गोठ्यांवर शेड किंवा ताडपत्री लावून सावलीची व्यवस्था करावी. गोठ्यांमध्ये हवा खेळती राहील अशी रचना असावी. दुपारच्या कडक उन्हात जनावरांना बाहेर न काढता सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळीच त्यांना चरण्यासाठी सोडावे. तसेच पौष्टिक व हिरव्या चाऱ्याची योग्य व्यवस्था करणेही महत्त्वाचे आहे.

काही ठिकाणी जनावरांना वेळेवर लसीकरण व उपचार न मिळाल्याने आजार वाढण्याची शक्यता असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा, ताप, श्वासोच्छ्वासाचा त्रास किंवा भूक न लागणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

उन्हाळ्यात जनावरांना थंड व स्वच्छ पाणी सतत उपलब्ध करून द्यावे. गोठ्यात पुरेशी सावली व हवेशीर व्यवस्था असावी. दुपारच्या वेळेत जनावरांना विश्रांती द्यावी. शरीरावर पाणी शिंपडल्यास उष्माघात टाळण्यास मदत होते. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. — डॉ. महेश शेळके, पशुवैद्यकीय अधिकारी, चाकण

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये

उन्हाची तीव्रता आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी सतर्क राहून जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: The heat is likely to pose a threat to the health of animals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • animals
  • Farmers
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
2

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
3

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
4

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.