Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navdurga Puraskar 2026: कला, क्रीडा ते समाजसेवा… पुण्यात कर्तृत्ववान महिलांना ‘नवदुर्गा पुरस्काराने’ सन्मानित

Navdurga Puraskar 2026 Pune: माणुसकी फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात 'नवदुर्गा पुरस्कार २०२६' सोहळा उत्साहात पार पडला. कला, क्रीडा, समाजसेवा व उद्योजकता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ८ कर्तृत्ववान महिलांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 03, 2026 | 01:29 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात ‘नवदुर्गा पुरस्कार २०२६’ सोहळा संपन्न
  • विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला सन्मानित
  • विद्यमान आमदार चेतन तुपे यांची उपस्थिती
Navdurga Puraskar 2026: माणुसकी फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवदुर्गा पुरस्कार २०२६’ सोहळा नुकताच पुणे शहरात मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना ‘नवदुर्गा पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आणि मनोगतात बोलताना आमदार चेतन तुपे यांनी, “देवीच्या वेगवेगळ्या रूपाप्रमाणे आजच्या नवदुर्गा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिलांना प्रत्येक क्षेत्रात मानसन्मान मिळाला पाहिजे व त्यांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी आग्रही असले पाहिजे,” असे प्रतिपादन केले. तर माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी स्व. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग सांगून उपस्थितांना अंतर्मुख केले.

‘या’ महिलांना पुरस्कार प्राप्त

या विशेष सोहळ्यात कला, क्रीडा, समाजसेवा, उद्योग आणि इतर क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या खालील मान्यवर महिलांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला:
१. सिनेअभिनेत्री असावरी तारे
२. राष्ट्रीय जलतरणपटू व गायिका श्रृंगेरी भावसार
३. श्वेता लिमये
४. समाजसेविका राखी रासकर व जया जोशी
५. आकांक्षा वाघ
६. उद्योजिका व ब्युटीशियन मंजुषा देशमुख
७. मा. आरतीताई करंजावणे
८. मानसी चंदगडकर

SSC Exam Schedule: SSC ची मोठी घोषणा! नोव्हेंबर २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ परीक्षेच्या तारखांमध्येही मोठे बदल

विद्यमान आमदार चेतन तुपे यांची उपस्थिती

सर्व पुरस्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे विद्यमान आमदार मा. श्री. चेतन तुपे, माजी आमदार, ज्येष्ठ साहित्यप्रेमी व कलाप्रेमी मा. श्री. उल्हासदादा पवार उपस्थित होते. यांच्यासह जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन सेंट्रल कमिटीचे सदस्य डॉ. अनिल माळी, माजी अध्यक्ष डॉ. सुवर्णा माळी, माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर, सुरेश धनावडे, सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका छायाताई भगत, सौ. रसिका भवाळकर, युवराज दिसले, मधुकर्णिका सासवडे, जितेंद्र बाराते, सुवर्णा काणे, निशा पाचोरकर, अशोक जगताप आणि दिलीप कारमपुरी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UPSC CDS 1 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ आयआयटी इंजिनिअरने मारली बाजी!

विजेत्या महिलांनी सन्मान स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रसिका भवाळकर यांनी मानले. हा सोहळा उपस्थित महिलांना नवी प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'नवदुर्गा पुरस्कार २०२६' सोहळ्याचे आयोजन कोणी केले होते?

    Ans: हा सोहळा माणुसकी फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

  • Que: या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते?

    Ans: पुण्याचे विद्यमान आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार उल्हासदादा पवार या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  • Que: या वर्षी कोणकोणत्या प्रमुख व्यक्तींना नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला?

    Ans: सिनेअभिनेत्री असावरी तारे, राष्ट्रीय जलतरणपटू व गायिका श्रृंगेरी भावसार, श्वेता लिमये, राखी रासकर, जया जोशी, आकांक्षा वाघ, मंजुषा देशमुख, आरतीताई करंजावणे आणि मानसी चंदगडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Navdurga puraskar 2026 pune winners list sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navrashtra

संबंधित बातम्या

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला चुकूनही ‘या’ वस्तू देऊ नका! लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी काय टाळावे?
1

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला चुकूनही ‘या’ वस्तू देऊ नका! लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी काय टाळावे?

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले
2

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले

Dhanteras 2026:  धन-संपत्तीच्या पूजेसाठी सज्ज व्हा! सोने-चांदी खरेदी, लक्ष्मी-कुबेर पूजेचे शुभ मुहूर्त एका क्लिकवर
3

Dhanteras 2026: धन-संपत्तीच्या पूजेसाठी सज्ज व्हा! सोने-चांदी खरेदी, लक्ष्मी-कुबेर पूजेचे शुभ मुहूर्त एका क्लिकवर

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतुकीचा बोजवारा! सावरकर आणि बंगाली चौकातील सिग्नल बंद; प्रवासासाठी नागरिकांची कसरत
4

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतुकीचा बोजवारा! सावरकर आणि बंगाली चौकातील सिग्नल बंद; प्रवासासाठी नागरिकांची कसरत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.