
Dhanteras 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. पैसा, सुख आणि भरभराट यांचा हा सण. यंदा 6 नोव्हेंबर 2026 ला धनतेरस आहे. या दिवशी आपण सगळे लक्ष्मी माता, कुबेर देव आणि धन्वंतरी देवाची पूजा करतो. या दिवशी सोनं-चांदी, नवीन भांडी घेणं खूप शुभ मानतात. त्यामुळे बाजारात पण खूप गर्दी असते. बऱ्याच जणांना या दिवशी एकमेकांना काहीतरी भेट द्यायची असते. पण भेट देताना पण काही गोष्टी पाळाव्या लागतात असं आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं आहे.काय काळजी घ्यावी? चला पाहूया. Dhanteras 2026:
धनत्रयोदशीला सगळेच पितळ, तांब्याची, स्टीलची भांडी घेतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणालाही रिकामं भांडं भेट म्हणून देऊ नका. त्यात थोडे तरी तांदूळ, एखादा लाडू किंवा काहीतरी ठेवा. तसंच तुम्ही कोणाला पर्स गिफ्ट करत असाल तर ती पण रिकामी देऊ नका. त्यात निदान 11 रुपये किंवा 5 रुपये तरी ठेवा. रिकामी वस्तू देणं अशुभ मानतात. भरलेलं दिलं की घरात बरकत राहते असं म्हणतात.
आपल्या घरात मिठाला खूप महत्व आहे. मीठ म्हणजे घराची समृद्धी असं मानतात. त्यामुळे धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवसात कोणालाही मीठ देऊ नये आणि कोणाकडून मागून पण घेऊ नये. याने घरातली लक्ष्मी निघून जाते अशी समजूत आहे.
काही घरांमध्ये दिवाळीत काळ्या रंगाची वस्तू गिफ्ट देणं चांगलं मानत नाहीत. काळा रंग हा काहींना आवडत नाही, सणाच्या दिवशी नको वाटतो. पण याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच काळी वस्तू देणं बंद आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे भेट घेताना समोरच्या व्यक्तीला काय आवडतं आणि तुमच्या घरात काय पद्धत आहे ते पाहून घ्या.
धारदार वस्तू म्हणजे चाकू, कात्री, सुरी अशा गोष्टी सणाच्या दिवशी भेट म्हणून देणं बरेच लोक टाळतात. असं म्हणतात की धारदार वस्तू दिली की नात्यात दुरावा येतो, भांडण होतं. ही जुनी मान्यता आहे. तुमच्या घरात असा काही नियम असेल तर तो नक्की पाळा.
ज्योतिषामध्ये काचेचा संबंध राहू ग्रहाशी जोडतात. राहू म्हणजे अडचणी आणि गोंधळ आणणारा ग्रह. त्यामुळे धनत्रयोदशीला काचेच्या बरण्या, आरसा किंवा काचेच्या शो-पीस अशा वस्तू खरेदी करणं किंवा गिफ्ट करणं बरेच लोक टाळतात.6. तेल आणि तूपची देवाणघेवाण करू नकातेल आणि तूप हे पूजेसाठी वापरतात. दिवा लावायला लागतं. त्यामुळे या दिवशी तेल किंवा तूप कोणाला देण्या-घेण्यापेक्षा आधीच आपल्या घरच्या पूजेसाठी आणून ठेवलेलं बरं असं शास्त्रात सांगतात.
Diwali 2026: दिवाळीच्या रात्री मुख्य दारावरच का लावले जातात दिवे? 99% लोकांना माहीतच नाही रहस्य
खरं तर धनत्रयोदशीला गिफ्ट देण्यामागचा उद्देश एकच असतो – आनंद वाटणे. नातं अधिक घट्ट करणे. तुम्ही साधं काहीही देऊ शकता. मिठाई द्या, फळं द्या, पूजेचं साहित्य द्या किंवा घरात लागणारी एखादी चांगली वस्तू द्या.सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तू किती महाग आहे यापेक्षा ती देताना तुमच्या मनात किती प्रेम आणि आदर आहे हे महत्वाचं आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात परंपरा वेगळी असते, त्याचा पण आदर करा आणि मगच भेटवस्तू निवडा.
Ans: लक्ष्मी माता, कुबेर देव आणि धन्वंतरी देवाची पूजा केली जाते.
Ans: पारंपरिक मान्यतेनुसार रिकामी भांडी देणे अशुभ मानले जाते. त्यात तांदूळ किंवा मिठाई ठेवून द्यावी, असे सांगितले जाते.
Ans: मीठ घरातील समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी मीठ देणे किंवा मागून घेणे टाळण्याची समजूत आहे.