Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 कोटी खर्चुनही शहर अस्वच्छ राहिल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; अमोल बालवडकर यांचा इशारा

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी प्रस्तावित असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या निधीवरून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर चांगलेच आक्रमक झाले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2026 | 03:09 PM
40 कोटी खर्चुनही शहर अस्वच्छ राहिल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; अमोल बालवडकर यांचा इशारा

40 कोटी खर्चुनही शहर अस्वच्छ राहिल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; अमोल बालवडकर यांचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी प्रस्तावित असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या निधीवरून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर चांगलेच आक्रमक झाले होते. अमोल बालवडकर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. “शहराच्या स्वच्छतेसाठी एवढा मोठा निधी जनतेच्या कररूपाने खर्च होत असेल, तर त्याचे सकारात्मक आणि दृश्य परिणाम प्रत्यक्ष रस्त्यावर दिसलेच पाहिजेत,” अशी आक्रमक भूमिका अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत मांडली आहे.

 

महापालिकच्या सभेत सविस्तर बोलताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शहरातील वाढत्या कचरा व स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनाचे गंभीर लक्ष वेधले. बालवडकर म्हणाले की, महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते, परंतु प्रत्यक्षात अनेक भागात अपेक्षित स्वच्छता आणि आरोग्यविषयक शिस्त दिसत नाही, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ४० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, पुढील तीन महिन्यांत पुणे शहरातील स्वच्छतेमध्ये आणि कचरा संकलनात आमूलाग्र बदल झालेला दिसलाच पाहिजे. जर या मुदतीत सुधारणा झाली नाही, तर हलगर्जी अधिकारी सोडले जाणार नाही, असा थेट इशारा अमोल बालवडकर यांनी दिला आहे.

“पुणेकरांच्या कररूपी पैशातून घनकचऱ्यासाठी ४० कोटी रुपये खर्च होत असताना शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता दिसलीच पाहिजे. जर तीन महिन्यांत यंत्रणेत सुधारणा झाली नाही, तर हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरू; यात कसलीही तडजोड केली जाणार नाही!”  – अमोल बालवडकर, नगरसेवक (राष्ट्रवादी)

हे सुद्धा वाचा  : दुधातील भेसळीवर मुंढेंचा बुलडोझर? राज्यव्यापी कठोर कारवाई मोहीम हाती घेण्याची  मागणी

शिंदेसेनेने मुख्य भवनच्या प्रवेशद्वारात ओतला कचरा

कचऱ्यासह इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून पुणे महापालिकेत आंदोलन केले. मुख्य भवनाच्या प्रवेशद्वारात कचरा ओतण्यात आला. माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी भानगिरे म्हणाले, ” पुणेकरांच्या कराच्या पैशातून विकासकामे केली जात असताना त्याचा दर्जा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व शून्य असल्याचे चित्र आज दिसत आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर महापालिकेचे प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शिवसेना पुणेकरांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरली असून प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत, तर यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.” आक्रमक घोषणाबाजी करत पुणेकरांच्या विविध नागरी समस्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Ncp corporator amol balwadkar has issued a warning to the pune municipal corporation administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.