Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी उत्स्फूर्त दाद त्यांच्या भविष्यातील प्रवासाला नवी उभारी देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 20, 2026 | 11:45 AM
कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; 'सुरेश कलमाडी जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; 'सुरेश कलमाडी जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित

Follow Us
Follow Us:

पुणे : देशभरातील विविध सांस्कृतिक उत्सवांच्या माध्यमातून नवोदित तसेच अनुभवी कलाकारांना नाटक, नृत्य आणि संगीताच्या सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते. मात्र, या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी समाजातील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्तींनी अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी उत्स्फूर्त दाद त्यांच्या भविष्यातील प्रवासाला नवी उभारी देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी केले.

 

३८ व्या ‘पुणे फेस्टिव्हल’च्या शानदार उद्घाटन सोहळ्यात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यंदाचा फेस्टिव्हल हा पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा सन्मान

या सोहळ्यात यंदापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या पहिल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. यासोबतच ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, ख्यातनाम नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांना मानाचा ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. निधी अगरवाल यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.

तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या ‘रणमर्द शिवाजी मंडळ’ आणि ‘श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान’ या संस्थांचाही विशेष गौरव करण्यात आला. या मंगल प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी आणि अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पुण्याशी असलेले ऋणानुबंध अतूट

“तुमच्या प्रेमळ शहरात येऊन मला नेहमीच अतिशय आनंद होतो,” अशा अस्खलित मराठी संवादाने भाषणाची सुरुवात करत हेमा मालिनी यांनी पुणेकरांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, “गेल्या ३० वर्षांपासून मी पुणे फेस्टिव्हलशी अत्यंत जवळून जोडलेली आहे. सुरेश कलमाडी यांनी नेहमीच या प्रतिष्ठित व्यासपीठावर कला सादर करण्याची संधी दिली आणि पुणेकर चोखंदळ रसिकांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रेम दिले.” मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवाच्या मूळ स्वरूपावर प्रकाश टाकला. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा विचार पुढे नेण्याच्या उदात्त हेतूनेच सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची संकल्पना प्रत्यक्षात आणली, असे त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

३८ वर्षांची अखंड सांस्कृतिक परंपरा

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, फेस्टिव्हलची ३८ वर्षांची यशस्वी वाटचाल ही केवळ आकडेवारी नसून पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिकाधिक समृद्ध करणारा सातत्यपूर्ण प्रवास आहे. यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी अत्यंत निष्ठेने तयार केलेली गणेशमूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. महोत्सवादरम्यान नेत्रदानासारख्या सामाजिक विषयांवर व्यापक जनजागृती केली जात असून, नागरिकांसाठी ५० हून अधिक वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आले आहेत.

Web Title: Hema malini has been honoured with the suresh kalmadi lifetime achievement award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • Hema Malini
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
1

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
2

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
3

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
4

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.