Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

गणेशोत्सवाच्या गर्दीत घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचा तिसरा डोळा म्हंटला जाणारा ‘एआय’ देखील नजर ठेवून असणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठ परिसरात तब्बल २५० ते ३०० एआय कॅमेऱ्यांचा वॉच ठेवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 21, 2026 | 12:30 AM
पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशोत्सवाच्या गर्दीत घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचा तिसरा डोळा म्हंटला जाणारा ‘एआय’ देखील नजर ठेवून असणार आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठ परिसरात तब्बल २५० ते ३०० एआय कॅमेऱ्यांचा वॉच ठेवला असून, गर्दीत मिसळलेल्या संशयितांपासून बेवारस वस्तू, आग-धूर आणि अचानक वाढणाऱ्या गर्दीपर्यंत प्रत्येक बाबीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा फोटो सिस्टिममध्ये अपलोड केल्याने तो व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत येताच फेस रेकग्निशनच्या माध्यमातून त्याचा अलर्ट देखील पोलिसांना मिळणार आहे.

 

वैभवशाली गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागात भाविकांची प्रचंड गर्दी होते. मंडळे, दर्शन तसेच देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. यंदा या आव्हानाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. शहरात सध्या साडेतीन हजारांच्या आसपास कॅमेरे कार्यरत असून, त्यात मध्यवर्ती पेठ परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणखी २५० ते ३०० एआय कॅमेऱ्यांची भर पडली आहे.

कॅमेऱ्यांमध्ये नाइट व्हिजनसह सुमारे २८ प्रकारचे एआय ॲनालिटिक्स लागू केले आहेत. त्यामुळे कॅमेऱ्यातील दृश्यांकडे केवळ पोलिसांनी पाहत बसण्याऐवजी विशिष्ट हालचाल किंवा घटना आढळल्यास त्याचा अलर्ट थेट नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. परिणामी, एखादी घटना घडल्यानंतर पोलिस पोहोचण्याऐवजी संभाव्य धोका लक्षात येताच प्रतिसाद देण्यास मदत होणार आहे.

गर्दीतला गुन्हेगार कॅमेऱ्याच्या नजरेत

पोलिसांच्या रेकॉर्डवरील वॉन्टेड किंवा सराईत गुन्हेगाराचा फोटो एआय सिस्टिममध्ये अपलोड केला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेता येणार आहे. गर्दीत संशयित व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत आली आणि तिचा चेहरा सिस्टिममधील डेटाशी जुळला, तर फेस रेकग्निशनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाला अलर्ट मिळणार आहे. कंट्रोल रूममध्ये कॅमेऱ्यात दिसलेली व्यक्ती आणि पोलिसांच्या रेकॉर्डमधील व्यक्तीची तुलना करून पुढील कारवाई करता येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळल्यास पोलिसांना त्याची माहिती तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.

गर्दी वाढली की पोलिसांना मिळणार अलर्ट

गणेशोत्सवातील सर्वाधिक महत्त्वाची बाब गर्दीची असते. शिवाजी रस्त्यासह महत्त्वाच्या मार्गांवर आणि गणपती मंडळांच्या परिसरात पीपल काउंटिंग ॲनालिटिक्सचा वापर करण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी नागरिकांची संख्या अचानक वाढल्यास त्याची माहिती नियंत्रण यंत्रणेला मिळू शकते. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊन संबंधित भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियमन किंवा इतर आवश्यक उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात ही यंत्रणा पोलिसांच्या नियोजनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

आग लागली, धूर झाला तरी कॅमेरा देणार इशारा

एआय कॅमेऱ्यांमध्ये फायर डिटेक्शन आणि स्मोक डिटेक्शन सारखी ॲनालिटिक्सही लागू करण्यात आली आहे. एखाद्या परिसरात आग किंवा मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळू शकते. त्यामुळे घटनास्थळी तातडीने पोलिस किंवा संबंधित यंत्रणेला पाठविण्यास मदत होणार आहे. त्याबरोबर एखाद्या व्यक्तीने संशयास्पद वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवली आणि ती वस्तू बराच वेळ तेथेच राहिली, तर त्याबाबतही अलर्ट मिळण्याची सुविधा आहे. गर्दीच्या ठिकाणी बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास संभाव्य धोका वेळीच लक्षात आणून देण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

कॅमेऱ्यांच्या ‘नजरे’त मध्यवर्ती पुणे

गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यातील गर्दी, वाहतूक आणि सुरक्षिततेचे आव्हान लक्षात घेऊन कॅमेऱ्यांच्या दृश्यांवर तसेच एआय ॲनालिटिक्समधून मिळणाऱ्या अलर्टवर नियंत्रण कक्षातून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसोबतच नियंत्रण कक्षातूनही शहराच्या महत्त्वाच्या भागावर तंत्रज्ञानाची नजर राहणार आहे.

“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीनशेच्या जवळपास एआय कॅमेरे असून, त्यामध्ये जवळपास २८ प्रकारचे ॲनालिटिक्स लागू करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती कायम ठेवतानाच नियंत्रण कक्षातून तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील महत्त्वाच्या भागांवर अतिरिक्त नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.” – विवेक पवार, सहायक पोलिस आयुक्त.

Web Title: The police have installed several ai cameras in the central part of pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • ganesh utsav
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
1

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.