Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

चाकण नगरपरिषदेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत सामील असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, जनतेच्या पैशांचा अपव्यय अथवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2026 | 12:30 AM
चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण नगरपरिषदेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत सामील असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांसोबत नसून चाकण शहराचा विकास आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य करीत आहोत. मात्र, जनतेच्या पैशांचा अपव्यय अथवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या पत्रकार परिषदेला गटनेते साहेबराव कड, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ, नगरसेवक सागर बनकर, आकाश जाधव, करण सोनावणे, नगरसेविका विजया तोडकर, वर्षा शेवकरी, रेश्मा मुटके यांच्यासह किशोर जगनाडे आणि दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

अतिक्रमण कारवाईबाबत माहिती न दिल्याचा आरोप

यावेळी साहेबराव कड यांनी नगरपरिषदेने नुकत्याच केलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत विरोधी पक्षातील नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचा आरोप केला. नगरपरिषदेतील महत्त्वाच्या विषयांबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक माहिती दिली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपरिषद प्रशासनाने अशा महत्त्वाच्या बाबींमध्ये पारदर्शकता ठेवली नसल्याचा आरोप कड यांनी केला.

झाडू खरेदीच्या दरावर आक्षेप

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या विविध साहित्य खरेदीवरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. विशेषतः झाडू खरेदीच्या निविदेतील दराबाबत आक्षेप नोंदविण्यात आला. बाजारात साधारणपणे १५० ते २०० रुपयांच्या दरात मिळणाऱ्या झाडूसाठी वाढीव दराने खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक सागर बनकर यांनी या साहित्य खरेदीला विरोध केला. जनतेच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक खरेदीमध्ये बाजारभावाची योग्य तपासणी करून आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे बनकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

४० कोटींच्या निधीचा हिशेब मागितला

नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीबाबतही विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासक राजवट येण्यापूर्वी नगरपरिषदेकडे जवळपास ४० कोटी रुपयांचा निधी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या निधीचा नेमका वापर कसा झाला, याबाबत विरोधी पक्षाला स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या निधीचा वापर, खर्च आणि शिल्लक रकमेचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. नगरपरिषदेच्या कारभारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला नाही, तर भविष्यात नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारभारात अशीच परिस्थिती राहिल्यास चाकण नगरपरिषद आर्थिक अडचणीत येऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नगरपरिषदेच्या विविध खरेदी प्रक्रिया, अतिक्रमण कारवाई तसेच आर्थिक व्यवहारांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी आणि संबंधित माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली.

Web Title: Ncp councilors have taken an aggressive stance regarding the functioning of the chakan municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • Chakan News
  • NCP News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण
1

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!
2

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा
3

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

NCP News : डिलिमिटेशन बिलावरून राष्ट्रवादीतच ठिणगी? माझा पक्ष पाठिंबा देणार असेल तर विरोध करणार! शरद पवार गटाच्या नेत्याचं ट्विट
4

NCP News : डिलिमिटेशन बिलावरून राष्ट्रवादीतच ठिणगी? माझा पक्ष पाठिंबा देणार असेल तर विरोध करणार! शरद पवार गटाच्या नेत्याचं ट्विट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.