Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

खेड तालुक्यातील नाणेकरवाडी–म्हाळुंगे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 06:09 PM
नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

Follow Us
Follow Us:
  • नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम
  • जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल
  • तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट
चाकण/अतिश मेटे : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. खेड तालुक्यातील नाणेकरवाडी–म्हाळुंगे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती म्हाळुंगे गणात विजय मिळवत आपला प्रभाव कायम राखला असून, पंचायत समिती नाणेकरवाडी गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाजी मारली आहे.

 

जिल्हा परिषद नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणेश बोत्रे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दणदणीत विजय मिळवला. स्थानिक पातळीवर विकासकामे, ग्रामस्तरावरील प्रश्न आणि सर्वसामान्य मतदारांशी असलेला थेट संवाद हे विजयाचे प्रमुख कारण ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

पंचायत समिती नाणेकरवाडी गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या रुपाली दिपक कांबळे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. महिलांचा सहभाग, स्थानिक कार्यकर्त्यांचे संघटन आणि प्रचारात घेतलेली आक्रमक भूमिका याचा या विजयात मोठा वाटा राहिला. दरम्यान, पंचायत समिती म्हाळुंगे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया सुधीर मुंगसे यांनी विजय संपादन केला. या निकालामुळे म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, आगामी काळात पंचायत समितीतील सत्तासमीकरणात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सतर्क होती. या निवडणुकीच्या निकालामुळे खेड तालुक्यातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्यासाठी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर नव्या रणनीती आखल्या जातील, असे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा : गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

Web Title: Ncp has achieved great success in the nanekarwadi mhalunge group in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Election News
  • Election Result
  • Khed

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.