सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का असा अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
अजित पवारांशिवाय पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांचे निधन हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, “अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी पायलट सुमित कपूर हा ,सुसाईड बॉम्बर होता का? लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच किंवा त्याप्रकारेच अजित पवार यांची हत्या झाली का? सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का?” असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका
पुढे ते म्हणाले की, “सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणत आहेत. मग खरोखरच विमान अपघातात सुमित कपूर यांचे निधन झाले का? अजित पवार यांच्या विमानाचे अगोदरच ठरलेले पायलट साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूककोडींत अडकले होते का? असाही थेट प्रश्न केला. ब्लॅक बॉक्सचे जाऊन द्या सध्या पण सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत,” अशा शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी संशय उपस्थित केला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
अजित पवारांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये त्यांचे मत मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अजित पवार यांच्या अपघातामागचे सत्य समोर यावे, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. जर माझ्या कार्यालातही कोण लाच घेत असेल तर मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत; अन्यथा, आम्ही त्यांनाही राजीनामा देण्यास सांगितले असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, अल्पसंख्याक शाळा मंजुरी प्रकरणाची चौकशी सुनेत्रा पवार यांच्या अधिकारक्षेत्रात सुरू आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल ते ते उघड करतील,” असेही फडणवीस यांनी नमुद केले.






