Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपारिक शेतीपेक्षा उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, तरच…; शरद पवारांनी मांडले मत

पारंपारिक शेती करण्यापेक्षा विविध व्यवसाय आणि उद्योगांवर महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तरच महाराष्ट्र पुढील काळामध्ये वेगवान गतीने प्रगती करू शकेल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 04:14 PM
पारंपारिक शेतीपेक्षा उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, तरच...; शरद पवारांनी मांडले मत

पारंपारिक शेतीपेक्षा उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, तरच...; शरद पवारांनी मांडले मत

Follow Us
Follow Us:

पुणे : देश स्वतंत्र झाला त्यावेळी 35 कोटी लोकसंख्या होती, आज लोकसंख्या वाढली मात्र जमीन तेवढीच आहे. शेतीला जमीन अपुरी पडत आहे. पारंपारिक शेती ही प्रत्येकाला नोकरी देण्यास सक्षम नाही, त्यामुळे पारंपारिक शेती करण्यापेक्षा विविध व्यवसाय आणि उद्योगांवर महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे तरच महाराष्ट्र पुढील काळामध्ये वेगवान गतीने प्रगती करू शकेल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय एक्स्पो 2027 प्रदर्शनचे ब्रोशरचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आमदार रोहित पवार, असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, माजी अध्यक्ष अंकुश आसबे, अरुण निमन, सई पाटील, सायली काळे, खजिनदार राजेश कुराडे आदी यावेळी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, उद्योगांचे अधिकाधिक विकेंद्रीकरण केले तर त्याचा फायदा समाजातील तळागाळामध्ये आणि विशेषता ग्रामीण भागामध्ये पोहोचू शकेल. एकेकाळी मुंबई औद्योगिक राजधानी होती परंतु उद्योगांचे प्रमाण कमी होत असताना या ठिकाणी आर्थिक राजधानी कशी निर्माण होईल यासाठी मी राज्याचा प्रमुख असताना प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला आली आहे. उद्योग क्षेत्रासंदर्भात निर्णय घेताना राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे असते. पायाभूत सुविधा सक्षम झाल्या पाहिजे तरच महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाणार नाही आणि त्यामधून निर्माण होणारे रोजगार मराठी तरुणांच्या हातातून जाणार नाही.

आमदार रोहित पवार म्हणाले, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे चाकणमधील उद्योजक महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. हिंजवडी मधील वाहतुकीची कोंडी कायम आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी पायाभूत सुविधांवर लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायिक दृष्ट्या सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्र मध्ये मिळते, अशावेळी उद्योगांना आकर्षित करणे अवघड आहे. डेटा सेंटर म्हणजे गुंतवणूक नव्हे दोन हजार कोटींच्या डेटा सेंटरमध्ये केवळ 200 लोकांना रोजगार देण्याची क्षमता असते. महाराष्ट्र मध्ये परकीय गुंतवणूक आली तरी त्याचा फायदा महाराष्ट्रामधील उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुण रोजगारक्षम आणि उद्योगक्षम होऊ शकेल.

विक्रम गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 35 टक्के इतके मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज उद्योग व्यवसायामध्ये मात्र केवळ एक ते दोन टक्के आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशन कार्यरत आहे. मराठी तरुणांमध्ये नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी मानसिकता कशी तयार करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत यासाठी 14 ते 17 वयोगटातील तरुणांना एक लाख रुपयांची औद्योगिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यामधून तरुण उद्योजक घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा : इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

असोसिएशनच्या अहिल्यानगर चाप्टर चे यावेळी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. असोसिएशनच्या बिझनेस एक्सपो यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गणेश सातपुते ,रवी घाटे, दिपाली चव्हाण, मोनिका बढाया, निलेश चव्हाण, विनोद जाधव, जगदीश कदम, विलास यादव, सागर यादव, राजू भिसे, महेश भागवत, सचिन खाटपे, चंद्रकांत गायकवाड, सुहास आदमाने, अंकुश आजबे  तेजराज पाटील, विक्रम गायकवाड, रोहन बिल्डर्स, मोहर ग्रुप डिजिटल डॅम, जवाहर चोरगे, सतीश कोकाटे, मधुकर चोरगे योगेश पासलकर, अजयसिंह देसाई, पू. ना गाडगीळ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Web Title: Ncp leader sharad pawar has urged a focus on industries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Farmers
  • MLA Rohit Pawar
  • MP Sharad pawar

संबंधित बातम्या

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा
1

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
2

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
3

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र
4

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.