Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Illegal Flex: अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचे ‘कागदी घोडे’; शहराचे विद्रुपीकरण पुन्हा सुरू, अद्याप गुन्हा दाखल नाही

आता महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 30, 2024 | 09:33 PM
Illegal Flex: अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचे 'कागदी घोडे'; शहराचे विद्रुपीकरण पुन्हा सुरू, अद्याप गुन्हा दाखल नाही

Illegal Flex: अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचे 'कागदी घोडे'; शहराचे विद्रुपीकरण पुन्हा सुरू, अद्याप गुन्हा दाखल नाही

Follow Us
Follow Us:

पुणे: निवडणूक निकालानंतर शहरात जागोजागी अनधिकृतपणे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. महापालिकेने इशारा देऊनही हे फ्लेक्स लागले. यावर मात्रा म्हणून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे उद्योग महापालिकेने सुरू केले आहेत. महापालिका प्रशासनाने अनधिकृत फ्ले्क्स लावणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीसांना कळविले आहे. एकही गुन्हा अद्याप दाखल झाला नाही. न्यायालयाने कान टोचल्यानंतरही महापालिका आणि पोलीस प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचे समोर आले आहे.

शहरातील अनधिकृत जाहिरातींमुळे होत असलेल्या विद्रुपीकरणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेस दि. १९ नोव्हेंबरला याबाबत आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेने निवडणूक निकालानंतर शहरात कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नागारिकांनी अनधिकृतपणे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स तसेच कोणत्याही प्रकारच्या जाहीराती न लावण्याचे आवाहन केले होते.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. मात्र, एका बाजूला महापालिकेकडून हे आदेश काढण्यात आलेले असताना निवडणुक निकालानंतर काही तासांतच सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदारांना शुभेच्छांसह भावी मंत्री म्हणून जागोजागी फ्लेक्स, बॅनर, जाहिरातफलक लागले आहेत. महापालिकेकडून त्यावर साधी कारवाई करण्याचीही तसदी घेतलेली नाही. त्यामुळे एका बाजूला न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात असतानाच या आदेशाचे राजरोसपणे उल्लंघन होत असताना महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

पालिका निवडणुकीच्या शक्यतेने बॅनरबाजी
दरम्यान, आता महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत. काही भागात फ्लेक्समुळे पदचार्‍यांना चालणे देखील कठीण झाले आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना फ्लेक्स लक्ष वेधून घेत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. संपूर्ण पुणे शहरात हे चित्र आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने युध्दपातळीवर कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून बेकायदा फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले जात आहे. तसेच, सुमारे अडीच लाख रूपयांचा दंडाच्या नोटीसाही दिल्या गेल्या आहेत. लवकरच शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स, बॅनर हटविले जातील.
– प्रशांत ठोंबरे, आकाशचिन्ह विभाग प्रमुख, पुणे महापालिका.

Web Title: No action by the municipal corporation and police against illegal flex in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 09:33 PM

Topics:  

  • flex
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय
1

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
2

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
3

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.