Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्पनाशक्तीला ‘एआय’चे पंख, AI मुळे चित्रकलेच्या विश्वात बदल; डिजिटल आर्टचा वाढता प्रभाव

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल आर्टच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक चित्रकला संस्कृती झपाट्याने बदलत आहे. आज AI आधारित प्लॅटफॉर्म काही सेकंदांत आकर्षक चित्रे तयार करू शकतात.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 05:01 PM
कल्पनाशक्तीला 'एआय'चे पंख, AI मुळे चित्रकलेच्या विश्वात बदल; डिजिटल आर्टचा वाढता प्रभाव

कल्पनाशक्तीला 'एआय'चे पंख, AI मुळे चित्रकलेच्या विश्वात बदल; डिजिटल आर्टचा वाढता प्रभाव

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : 
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल आर्टच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक चित्रकला संस्कृती झपाट्याने बदलत आहे. कॅनव्हास, रंग आणि ब्रश यांच्या जोडीला आता डिजिटल टॅबलेट, ग्राफिक सॉफ्टवेअर आणि AI-आधारित साधनांनी कलाकारांच्या अभिव्यक्तीला नवे परिमाण दिले आहे. त्यामुळे कला क्षेत्रात सर्जनशीलतेची नवी दारे खुली झाली असली, तरी पारंपरिक कलाशैलीसमोर काही आव्हानेही निर्माण झाली आहेत.

 

पूर्वी चित्रकलेसाठी दीर्घ साधना, प्रत्यक्ष रेखाटन आणि रंगसंगतीचे कौशल्य आवश्यक मानले जात होते. मात्र आज AI आधारित प्लॅटफॉर्म काही सेकंदांत आकर्षक चित्रे तयार करू शकतात. कलाकार फक्त कल्पना किंवा मजकूर लिहिताच संगणक त्या आधारे डिजिटल चित्र तयार करतो. त्यामुळे संकल्पना मांडण्याचा वेग वाढला असून जाहिरात, गेमिंग, अॅनिमेशन, चित्रपट आणि सोशल मीडियामध्ये डिजिटल आर्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

डिजिटल आर्टमुळे नवोदित कलाकारांना कमी खर्चात आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन गॅलरीमुळे कलाकार थेट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. NFT आणि डिजिटल कलेक्शनच्या माध्यमातून कलाकृतींची विक्रीही नव्या स्वरूपात सुरू झाली आहे. त्यामुळे कला क्षेत्र अधिक तंत्रज्ञानाधारित आणि व्यावसायिक बनत असल्याचे चित्र दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, AI हे कलाकारांना पर्याय नसून सहाय्यक साधन आहे. मानवी भावना, अनुभव आणि कल्पनाशक्ती यांची जागा कोणतेही तंत्रज्ञान पूर्णपणे घेऊ शकत नाही. मात्र AI मुळे कॉपीराइट, मौलिकता आणि कलाकारांच्या रोजगारासंबंधी प्रश्नही पुढे येत आहेत. अनेक कलाकारांनी AI निर्मित चित्रांवर नियंत्रण आणि स्पष्ट नियमांची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा : मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

शैक्षणिक संस्थांमध्येही आता डिजिटल आर्ट आणि AI आधारित डिझाइनचे प्रशिक्षण दिले जात आहे. पारंपरिक चित्रकलेसोबत डिजिटल कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे कला अधिक वेगवान, जागतिक आणि प्रयोगशील झाली असली, तरी मानवी संवेदनाच खरी कलाकृती जिवंत ठेवतात, असे मत कला क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

तुम्ही तुमच्या भावना जर एआयला सांगितल्या तर त्या तुमच्यासमोर तो मांडतो पर्यायी चित्रे दाखवते. आधी असे नव्हते की आपल्याला जे मांडायचं आता हे सोपे होत आहे. आधी शैलीवर अभ्यास करावा लागायच. नंतर ते चित्र रेखाटले जायचे. आता हे थोडे सोपे झाल्याचे दिसून येते. चित्रकारांनी जास्त सजग व्हायला पाहिजे आपली स्टाईल डेव्हलप करूनच नवीन नवीन शिकून समोर आणायला हवं. कारण किती झालं तरी आपली स्टाईल आपण डेव्हलप करतो. यामुळेच चित्रकाराची ओळख निर्माण होते. – सगुण पाटील (चित्रकार)

Web Title: Painting culture is rapidly changing due to ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • ai
  • Digital news
  • pune news

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
2

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
3

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
4

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.