
Pune Leopard Attack: दैव बलवत्तर! दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट...; पारगावमध्ये महिलेसोबत घडले काय?
पारगाव शिंगवे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले केले आहेत. असाच एक प्रकार पारगाव शिंगवेमध्ये घडला आहे. गोठ्यात बांधलेल्या गायींवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला केला. या महिलेच्या अंगात जर्किंन असल्यामुळे महिला सुदैवाने वाचली. ही घटना बुधवारी पाच रोजी पारगाव (ता.आंबेगाव ) येथील चिचगाई मळा येथे साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अश्विनी शिवाजी ढोबळे (वय. 28 ) असे बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पारगाव येथील चिचगाई वस्ती येथे शिवाजी शिवाजी देवराम ढोबळे यांचे घर असून घराच्या बाजूला गाईचा गोठा आहे. या गोठ्यात गाई बांधलेल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता सुमारास अश्विनी ढोबळे या गोठ्याच्या बाजूला आल्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्या हा गायीच्या गोठ्यातील गायांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्यांना गायींचा मोठ्याने हंबरण्याचा आवाज आला. त्यानंतर अश्विनी या गोठ्याच्या बाजूला कसला आवाज येत आहे, म्हणून वळून पाहत असता लहान वासरू त्यांच्या जवळ बाजूला पडले.
Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…
बिबट्याने अश्विनीवर हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनीच्या अंगात जर्किंन असल्यामुळे त्या वाचल्या. त्यांनी हाताने हिसका दिल्यामुळे व व प्रतिकार केल्यामुळे , आरडाओरड केल्यामुळे बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला. या बिबट्याच्या भीतीने अश्विनी ढोबळे या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले दोन तासाने त्या शुद्धीवर आल्या.