Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Flood: आत्तापासूनच ‘या’ कुटुंबांच्या स्थलांतरासाठी जागा शोधा: पुणे पालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पुणे महानगरपालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी भविष्यातील धोका टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2024 | 02:35 AM
Pune Flood: आत्तापासूनच 'या' कुटुंबांच्या स्थलांतरासाठी जागा शोधा: पुणे पालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

Pune Flood: आत्तापासूनच 'या' कुटुंबांच्या स्थलांतरासाठी जागा शोधा: पुणे पालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहरात पुराचे पाणी घुसणाऱ्या २९ ठिकाणच्या कुटुंबाचे पावसाच्या कालावधीत स्थलांतर करण्यासाठी आत्तापासूनच जागा शाेधण्यास सुरुवात करा, असे आदेश  महापािलका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिले आहे. पुराचे कारण शाेधण्यासाठी नियुक्त समितीच्या पहील्याच बैठकीत आयुक्तांनी अल्पकालीन आणि दिर्घ कालीन कामांचा आराखडा तयार करण्यास सांगितला आहे.

यावर्षी पावसाळ्यात  सिंहगड रोड परिसरात मुठा नदीच्या पूराचे पाणी घुसले हाेते. यावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागातही आरोपप्रत्यारोप झाले होते. त्यामुळे पुराचे खरे कारण शोधण्यासाठी आयुक्त भोसले यांनी चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने  नुकताच अहवाल सादर केला असुन, त्यांची पहीली बैठक पार पडली. या समितीचे सदस्य अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी या बैठकीविषयी माहीती दिली.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, समितीचे सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अल्पकालीन कामे करण्याची सूचना केली. तर भविष्यातील धोका टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरामध्ये पावसाळ्यात मुठा- मुळा नदी अािण इतर अाेढे नाल्यांचे पाणी शिरतात अशी २९ ठिकाणे अाहेत. या भागात बाधित हाेणाऱ्या कुटुंबियांचे पावसाळ्याच्या कालावधीत तात्पुरते स्थलांतर करणे अावश्यक अाहे. त्यासाठी अात्तापासूनच जागा शाेधण्यास सुरुवात करा, असे आदेश आयुक्त डाॅ. भाेसले यांनी दिले आहे.

हेही वाचा: पुण्यात ‘या’ कारणांमुळे आला पूर; अहवालाची कार्यवाही होणार; महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

या बैठकीत शहरात अनेक भागांत पर्जन्य मापक बसवावे, त्याची नाेंद आपत्पकालिन परीस्थिती विभागाकडे करावी अशा प्रकारच्या सुचनांवर या बैठकीत चर्चा झाली. पावसाळ्यात उदभवणाऱ्या परिस्थितीला ताेंड देण्यासाठी आणि आवश्यक ती कामे खर्च करण्यासाठी आगामी  अंदाजपत्रकात तरतुद केली जाणार आहे. यावर्षी पुणे शहरात अत्यंत मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडला. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. सोडलेले पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळे पुणे शहरातील काही भागात पुराचे पाणी शिरले होते. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, समितीचे सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अल्पकालीन कामे करण्याची सूचना केली.

अल्पकालीन उपाययोजना 
– नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, नदीपात्रातील राडारोडा काढणे
– नदीपात्रातील राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे
– कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित विभागासह क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग
– या विभागांनी कारवाई सुरु करावी

हेही वाचा: नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे काम सुरूच; पुण्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता, पालिकेचे दुर्लक्ष

दीर्घकालीन उपाययोजना 
– पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी अनावश्यक बंधारे काढणे
– पूरग्रस्त होणाऱ्या भागाचे स्थलांतर करणे
– एकतानगरी येथील घरांचे क्लस्टर डेव्हलपमेंट करणे
– पुराच्या पाण्यास रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे
– नदीपात्रात झालेली अवैध बांधकामे काढून टाकणे
– याचा सविस्तर आराखडा तयार करून कारवाई व उपाययोजनांचे नियोजन करणे

Web Title: Pmc comissioner ias dr rajendra bhosale orderd to officers from family migration before rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Rajendra Bhosale

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.