• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Construction In Mutha River Flood Alert For Pune City Neglect By The Pmc

नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे काम सुरूच; पुण्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता, पालिकेचे दुर्लक्ष

पुरजन्य परिस्थितीनंतर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेने नदीमध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरूंद केल्यामुळेच पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यास भाजपच कारणीभूत असल्याची टिका राजकीय पक्षांसह पर्यावरणप्रेमींकडून झाली. सर्व क्षेत्रातून टिका झाल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2024 | 06:27 AM
नदीपात्रात राडाराेडा टाकण्याचे काम सुरूच; पुण्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता, पालिकेचे दुर्लक्ष

(फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे:  मुठा नदीचे पात्र हे डंपिंग ग्राऊंड झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच शहराला पुराच्या पाण्याचा फटका बसला हाेता. त्यानंतर नदीपात्रालगत टाकण्यात आलेला दाेनशे डंपर इतका राडाराेडा काढला गेला. परंतु पुन्हा एकदा नदीत बांधकामाचा राडाराेडा टाकण्यात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या जाेरदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतून मुठा नदीत माेठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला हाेता. तेव्हा शहराच्या विशेषत: सिंहगड रस्ता भागातील एकतानगर भागाला फटका बसला हाेता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ आदी नेत्यांनी या भागाची पाहणी केली हाेती. नदीत कमी वेळेत जास्त पाणी साेडले गेल्याने हा पुर आल्याचा दावा केला जात हाेता.

नदीपात्रात आणि  काठावर माेठ्या प्रमाणावर राडाराेडा टाकण्यात आल्याने  शहरात पुरस्थिती निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला. तसेच एकतानगर भागात आणि  त्यापुढील भागातुन सुमारे दाेनशे डंपर इतका बांधकामाचा राडाराेडा काढण्यात आला हाेता. मुठा नदीच्या पुर रेषेत सुमारे ५ एकर क्षेत्रावर भराव टाकून भला मोठा प्लॉट तयार केल्याचे समोर आल्यानंतर आता पुन्हा नदीपात्रात भराव टाकण्यास सुरूवात झाली. सिहंगड रस्त्यावरील एकता नगरच्या पलिकडील कर्वे नगर वारजेच्या नदीपात्रात डंपरच्या डंपर खाली केले जात आहेत. पुरामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्यानंतरही महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने भविष्यात पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे.

यंदा शहर आणि धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेला. केवळ ३५ हजार क्युसेस विसर्गामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील नदीकाठच्या सिंहगड रस्ता परिसतारील विठ्ठलनगर, एकतानगरी, निंबजनगर, पाटील इस्टेट, शांतीनगर, तसेच, येरवडा, पुलाचीवाडी आदी भागात कंबरे इतके पाणी होते. या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नदीकाठलगतच्या परिसरात आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू होती. तब्बल ५ हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागेले. तर, विविध दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता.

पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत

पुरजन्य परिस्थितीनंतर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेने नदीमध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरूंद केल्यामुळेच पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यास भाजपच कारणीभूत असल्याची टिका राजकीय पक्षांसह पर्यावरणप्रेमींकडून झाली. सर्व क्षेत्रातून टिका झाल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली. या आरोप आणि टिकांमुळे पालिकेने कारणे शोधायला सुरूवात केल्यानंतर पालिकेला कर्वे नगर ते शिवणे या भागातील नदीपात्राच्या पुररेषेत सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रात भुखंड तयार केल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात ही जागा १५ ते २० एकर असल्याचे बोलले जात आहे. राडारोड्यामुळे नदीपात्रात एक भींत तयार झाली आहे. या भरावामुळे नदीने तिचे पात्र सोडल्याने सिंहगड परिसरात पाणी शिरल्याचा आरोप केला गेला. मात्र, जवळपास पावसाळा संपत आल्याने महापालिकेला या सर्व गाष्टींचा विसर पडला. त्यामुळे पुन्हा बेकायदा भराव टाकून प्लॉट करण्याचे उद्योग सुरू झाले. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात पुणेकरांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

आयुक्तांनी प्रतिक्रिया देणे टाळले

नदीपात्रात भराव टाकल्याची गोष्ट महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावर प्रतिक्रीया देणे टाळले. त्यामुळे भराव टाकून नक्की कोणाचे भले करायचे आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: Construction in mutha river flood alert for pune city neglect by the pmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Rajendra Bhosale

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.