पीएमपीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद (फोटो- सोशल मीडिया)
लोणावळा आणि पानशेत भागात पर्यटकांचा कल
पीएमपीच्या पर्यटन बसला नागरिकांचा प्रतिसाद
तीन महिन्यात साडेतीन हजार पर्यटकांनी केली सफर
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या पर्यटन बसला डिसेंबर महिन्यात पीएमपीच्या पर्यटन बसला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पुणे पर्यटन बसच्या माध्यमातून मागील तीन माहिन्यात ३ हजार ४०४ पर्यटकांनी लोणावळा आणि पानशेत वरसगाव या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. पीएमपीच्या या पर्यटन बसला दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसत आहे.
पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पीएमपीला १६ लाख ७२ हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या हिवाळयाचे ऋतू असल्यामुळे पर्यटक लोणावळा आणि पानसेत वरसगाव या भागात जास्त मागणी असल्याची माहिती पर्यटन बस समन्वयक नितीन गुरव यांनी दिली आहे.
महिना प्रवासी संख्या उत्पन्न
ऑक्टोबर ७६४ ३ लाख ७२ हजार
नोव्हेंबर १२८४ ६ लाख ४२ हजार
डिसेंबर १३५६ ६ लाख ७८ हजार
एकूण ३४०४ १६ लाख ७२ हजार
पर्यटकांना पर्यटण करण्यासाठी पीएमपीच्या बसमधून सुरक्षित प्रवास असतो.म्हणून दिससेंदिवस पर्यटण बसला मागणी वाढत आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…
किशोर चौहान,
जनसंपर्क अधिकारी,पीएमपी
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार!
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांना वेळेवर, विश्वासार्ह बससेवा मिळावी, यासाठी ‘पंक्चालिटी वीक’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात (Pune) बस वेळेवर सुटणे, ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणे, तसेच चालक व वाहक वेळेवर हजर राहणे यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या व वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जाणार असून, निष्काळजीपणा आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! PMP प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; निष्काळजीपणा आढळल्यास…
पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या पुढाकाराने यापूर्वी फिल्ड वीक आणि स्वच्छता आठवडा हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले होते. या कालावधीत बससेवेतील स्वच्छता, तांत्रिक स्थिती, कर्मचारी कामकाज आणि प्रवाशांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या त्रुटींवर सुधारणा सुरू असून, आता पुढील टप्प्यात वक्तशीरपणा हा केंद्रबिंदू मानून ‘पंक्चालिटी वीक’ राबवला जाणार आहे. या आठवड्यात बस फेऱ्यांची वेळपालन टक्केवारी, उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा, तसेच वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी केली जाणार आहे.






