Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतीच्या बस पाससाठी ग्रामीण भागातील नागरिकांकडून पुणे शहरातील वीज बिलाचा रहिवासी पुरावा मागितला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 03:57 PM
ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

Follow Us
Follow Us:

नीरा : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतीच्या बस पाससाठी ग्रामीण भागातील नागरिकांकडून पुणे शहरातील वीज बिलाचा रहिवासी पुरावा मागितला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बस सेवा ग्रामीण भागापर्यंत सुरू असताना सवलतीसाठी मात्र ‘शहरी’ अट लावली जात असल्याने ग्रामीण प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

नीरा (ता. पुरंदर) येथील एका ज्येष्ठ महिलेला सवलत ओळखपत्रासाठी अर्ज करताना राहत्या घराचा पुरावा म्हणून स्थानिक लाईट बिलाची प्रत सादर करूनही ते पुणे शहरातील नसल्याचे कारण देत अर्ज प्रक्रियेत अडथळा आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे.

पीएमपीएलच्या बस सेवा पुणे शहरापुरत्या मर्यादित न राहता जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सुरू आहेत. हडपसर–नीरा मार्गावर मागील महिन्यापासून दर अर्ध्या तासाला बस सेवा सुरू झाल्याने ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासी संख्येत वाढ होऊन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत असताना त्याच ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या पाससाठी शहरातील वीज बिलाची अट लावणे हा सरळ दुजाभाव असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.

नीरा हे पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील महत्त्वाचे शहर मानले जाते. अनेक शासकीय योजनांमध्ये आणि प्रशासकीय नोंदींमध्ये शहर म्हणून गणना होत असतानाही स्थानिक रहिवाशांचे वीज बिल ग्राह्य धरले जात नसल्याने प्रशासनाच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही प्रवासी पुणे शहरात भाड्याने राहत असल्याचा पुरावा देऊन पास मिळवत असल्याची चर्चा आहे. मात्र, भविष्यात एखादा अपघात झाल्यास रहिवासी कागदपत्रांतील तफावत विमा दाव्यात अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे प्रामाणिक प्रवासी चुकीची कागदपत्रे देण्यास तयार नसून, प्रशासनाच्या नियमांमुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

“संपूर्ण पुणे जिल्हा पीएमआरडी क्षेत्र म्हणून घोषित असताना ग्रामीण भागातील लाईट बिल ग्राह्य धरले जात नाही, ही विसंगती आहे. उत्पन्न चालते; पण पत्ता चालत नाही, ही प्रशासनाची भूमिका आश्चर्यकारक आहे.” — प्रकाश माने, ग्रामस्थ

प्रशासनाची भूमिका स्पष्ट होणार का?

ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत ही सेवा ज्या भागात उपलब्ध आहे त्या सर्व प्रवाशांना समान निकषांवर मिळाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सवलतीपासून वंचित ठेवणारा कारभार तात्काळ दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

“बस आमच्या गावात येते, भाडे आमच्याकडून घेतले जाते; पण सवलत देताना आम्ही पुणे शहराचे नसल्याचे सांगितले जाते. हा कोणता न्याय?” — देविदास माने, नियमित प्रवासी

हे सुद्धा वाचा : इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Web Title: Pmpl administration has made urban light bill mandatory for senior citizens in rural areas for concession passes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • PMPML
  • PMPML Bus
  • Pune mahapalika

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.