पुण्यात भीषण अपघात! CNG पंपावर गॅसचे नोझल उडाले अन्...; Video Viral
पुणे: सोशल मीडियावर अलीकडे अनेक अपघातांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. नुकताच पुण्यात एक भीषण अपघात घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CNG पंपावर गॅस भरत असताना हा भीषण अपघात घडला. गाडीत गॅस भरताना अचानक गॅसचे नोझल उडाले अन् कर्माचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. नोझल उडून थेट कर्मचाऱ्याच्या डाव्या डोळ्याला लागले. ही दूर्दैवी घटना धनकवडीत घडली. याघटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी CNG पंपाच्या मालकावर तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
कसा घडला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षाचा हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे या कामगाराचे नाव आहे. तो धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सीएनजी पेट्रोल पंपावरपंपावर काम करत असताना हा अपघात घडला. तो एका दुचाकीमध्ये गॅस भरत असताना अचानक गॅसचे नोझल त्याच्या चेहऱ्यावर उडाले. दूर्दैवाने त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा डावा डोळा निकामी झाल्याचे सांगितले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ
पंपमालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
गेहलोत यांनी या प्रकरणी सहकारनगर येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सीएनजी पंपमालकासह व्यवस्थापक धैर्यशील पानसरे, राहीत हरकुर्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत पंपाचे मालक, तसेच व्यवस्थापकाने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
CNG पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे CNG पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गॅस भरताना निष्काळजीपणा कर्मचारी व ग्राहकाला किती महागात पडू शकतो हे या घटनेवरु लक्षात घेण्यासारखे आहे. यामुळे अत्याधुनिक साधनांचा वापर CNG पंपावर करणे, तसेच सुरक्षेच्या सर्व सोयी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पंपावरील उपकरणांची नियमित तपासणी, तसेच इतर पंपावरील नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
घटनेटचा व्हिडिओ व्हायरल
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, गॅसचे नोझल थेट कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर डाव्या डोळ्याला जोरात लागले. या व्हिडिओवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित पंप प्रशासनावर कारवाईची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा