फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टींचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण डान्स रिल्स असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तसेच लहानपणीची आठवण करुन देणारे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून .तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण येईल.
तुम्ही लहानपणी अनेक खोड्या काढल्या असतील, मजा-मस्ती केली असेल. तसेच तुम्ही सायकल चालवायला देखील शिकला असाल. शिकताना अनेकदा पडला असाल, रडला असाल, पण कधी दोघांनी मिळून सायकल चालवली आहे का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणती माहिती उपलब्ध नाही. चला पाहूयात नेमकं काय घडलं व्हिडिओत.
सायकल चालवण्याची नवी कोरी पद्धत
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सायकल दोन शाळकरी मुले चालवताना दिसत आहेत. पण सायकल चालवण्याची ही पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल. यामध्ये एक मुलगा एका पेडलवर, तर दुसरा दुसऱ्या पेडलवर उभा, असून सायकल मारत आहेत. विशेष म्हणजे अगदी तोल सांभाळत दोघांनीही काळजीपूर्वक सायकल चालवली आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांना धक्का बसला आहे. या लहानग्यांचा भन्नाट जुगाडाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hasna_aur__hasana या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तपार्यंक लाखोहूंन अधिक लाईक मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मी देखील लहानपणी अशी सायकलं चालवली आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, भारतात टॅलेंटची कमी नाही. तिसऱ्या एका युजरने ही टेक्निक भारताबाहेर गेली नाही पाहिजे असे म्हटले आहे. खतरनाक, पोरं आहेत लका असेही एकाने म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.