
Pune Autorickshaw Fare Hike (Photo Credit- AI)
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रिक्षा संघटनांनी सातत्याने केलेल्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
| अ. क्र. | प्रवास टप्पा | जुना दर (रु.) | नवीन सुधारित दर (रु.) | वाढ (रु.) |
| १ | पहिले १.५ किलोमीटर (किमान भाडे) | २५ रुपये | ३० रुपये | + ५ रुपये |
| २ | पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी | १७ रुपये | २० रुपये | + ३ रुपये |
आझाद रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शफीक पटेल यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “ऑगस्ट २०२२ नंतर भाड्यात कोणतीही वाढ झाली नव्हती. या कालावधीत सीएनजीचे दर प्रति किलो ९१ रुपयांवरून थेट ९६ रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच वाहनांच्या सुट्या भागांच्या आणि देखभालीच्या खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे भाडेवाढ करणे अत्यंत गरजेचे होते.”
Pune Metro: पुण्याच्या विकासाला ‘मेट्रो’ची गती; हिंजवडी अन् पश्चिम पुण्यात रिअल इस्टेटचा सुवर्णकाळ
दरम्यान, या भाडेवाढीवर प्रवाशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नवीन दर लागू होण्यापूर्वी सर्व रिक्षांचे डिजिटल मीटर तातडीने ‘री-कॅलिब्रेट’ (Recalibrate) करण्यात यावेत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ‘राइड-हेलिंग’ (Ride-hailing apps) प्लॅटफॉर्मवरही सुधारित दर अद्ययावत केले जावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण असून, काही रिक्षाचालकांकडून होणाऱ्या मनमानी भाडेवसुलीचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. निगडी येथील रहिवासी यांनी सांगितले की, “जर भाडे वाढवले जात असेल, तर जादा भाडे वसूल करणाऱ्या आणि मीटरप्रमाणे न जाणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी. नियमांचे पारदर्शकपणे पालन व्हावे यासाठी आरटीओने नियमित तपासणी मोहीम राबवणे गरजेचे आहे.”
पुणे महापालिकेत बोगस भरतीचे रॅकेट, कंत्राटी कामगारांना कायम करा; मनसेची मागणी