Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेची कारवाई; तब्बल 52 लाखांचा दंड वसूल

सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील  सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2025 | 02:35 AM
Pune News: अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेची कारवाई; तब्बल 52 लाखांचा दंड वसूल
Follow Us
Follow Us:

पुणे: शहरात अनधिकृत फ्लेक्स बॅनरबाजी सुरू असतानाच अनधिकृत फ्लेक्स विरोधात महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह  विभागाने कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात एकूण ५२ लाख रुपयाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ११० जणांविरुद्ध कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील  सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.  उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७  मध्ये  अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध कारवाई  करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या वर्षी असेच आदेश जारी केले आहेत.  त्यानुसार पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृतपणे उभारले जाणार्या होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध  मागील तीन महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे, त्याअंतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये १४४९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात  दुसरी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६५९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्यात आले.  कारवाईत सातत्य ठेवून  ५२लाख ३२ हजार रुपये इतका  दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ११० व्यक्ती संस्था, नागरीक, व्यावसायिक यांचेवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हे केले आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी दिली.

हेही वाचा: Illegal Flex: अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचे ‘कागदी घोडे’; शहराचे विद्रुपीकरण पुन्हा सुरू, अद्याप गुन्हा दाखल नाही

इथे करा तक्रार

सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांची जबाबदार तथा अंमलबजावणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असुन त्यांचेवर नियंत्रण ठेवणेकामी संबंधित उप आयुक्त परिमंडळ क १ ते ५ यांची नोडल / पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
– नागरिकांना अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बैनर याचाबत तक्रार करावयाची असल्यास
पीएमसी केअर ऐप, W-Web-pmc.gov.in, कॉल सेंटर (18001030222) , व्हॉट्सअॅप -9689900002, ईमेल feedback@punecorporation.org येथे तक्रार करावी.

अभ्यासिका, क्लासचालक यांच्या विरोधात कारवाई

पुणे : महापालिकेची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता जाहीरात फलक लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने सदाशिव पेठेतील तीन अभ्यासिका व क्लासचालकांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनीही संबंधीतांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील अप्पा बळवंत चौक, नुमवि शाळे शेजारी, शनिपार चौक, शनि मंदिराजवळ, बाजीराव रोड येथे महापालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे काही अभ्यासिकांनी व स्पर्धा परीक्षेच्या क्लासचालकांनी बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आकाश चिन्ह व परवाना निरीक्षक केदार पुरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधीत अभ्यासिका चालक व क्लासचालकांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधीतांवर गुन्हा दाखल केल्याचे पुरी यांनी सांगितले.

Web Title: Pune carporation action against illegal flex and hoardings and collect 52 lakhs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • flex
  • Pune
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
1

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
2

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
3

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
4

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.