Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

नागरिकांच्या घराघरातून कचरा संकलित करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या पुणे महापालिकेच्या घंटागाडीचा चालकच दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आल्याचा प्रकार कोंढवा खुर्द येथे समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2026 | 02:58 PM
कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात घंटागाडी चालकाची गंभीर चूक
  • कोंढव्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
  • मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने गुन्हा दाखल
पुणे : नागरिकांच्या घराघरातून कचरा संकलित करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या पुणे महापालिकेच्या घंटागाडीचा चालकच दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आल्याचा प्रकार कोंढवा खुर्द येथे समोर आला आहे. दारूचे सेवन करून वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सचिन संभाजी गंडले (वय ४१, रा. उंड्री) याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मेहबूब अजमेर पटेल (वय २८, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे.

 

२ ऑक्टोबर रोजी गल्ली क्रमांक तीन, फातिमा मशिदीच्या कमानीसमोर, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंडले हा पुणे महापालिकेच्या घंटागाडीवर चालक आहे. महापालिकेची कचरा वाहतूक करणारी वाहने शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच अरुंद गल्लीबोळांतून दररोज धावत असतात. या वाहनांमुळे यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चालकाची दक्षता आणि वाहनांची सुरक्षितता हा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या घंटागाडीचा चालकच मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्याने महापालिकेच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घंटागाडी चालकांची ड्युटीपूर्वी मद्यपान तपासणी केली जाते का? चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि वाहनांची फिटनेस तपासणी होते का? चालकांना वाहन ताब्यात देण्यापूर्वी त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा आहे का, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. कोंढवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा  : १२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Web Title: A municipal garbage truck driver has been found driving under the influence of alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Pune Crime
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार
1

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
2

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराला गती; सुधारित आराखड्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू
3

रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराला गती; सुधारित आराखड्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान
4

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.