Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kundmala Accident: ‘कुंडमळा’ दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल रविवारी दुपारी कोसळून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण नदीत पडले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2025 | 11:13 PM
Kundmala Accident: ‘कुंडमळा’ दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
Follow Us
Follow Us:

पुणे: कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना घडल्यावर याची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व जुने व जीर्ण झालेले पूल,साकव दुरुस्ती करण्याऐवजी काढूनच टाकण्याचे आदेश जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. दरम्यान आठच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांना जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तेथे बॅरिकेटिंग केले होते. परंतु अद्याप हा एकत्र अहवाल आला नसल्याने जिल्ह्यात असे किती धोकादायक पूल आहेत हे अंधारात आहे.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल रविवारी दुपारी कोसळून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण नदीत पडले होते. अवघ्या अर्ध्या तासात या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहचल्याने या सर्वांना वाचविण्यात यश आले. या ठिकाणी हा पूल धोकादायक आहे असा फलक लावून बॅरिकेटिंग करून तो बँद केला होता. पण उत्साही पर्यटक यांनी त्याच्यावर एकाच वेळी गर्दी केल्याने तो कोसळला.

याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही घटना घडण्यापूर्वीच आठ दिवस अगोदर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जिल्ह्यातील जुन्या व जीर्ण झालेल्या साकव पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या दोन्ही यंत्रणांनी ऑडिटचे काम करून त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले पण ही घटना या दरम्यानच घडली. त्यामुळे आता जिल्ह्यातील जीर्ण साकव ( दोन गावांना नदीवरून जोडणारा छोटा पूल), धोकादायक पूल पूर्णपणे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कुंडमळा दुर्घटनेची सखोल चौकशी; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

समिती सूक्ष्म चौकशी करणार

सदर घटनेची सूक्ष्म चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसांत आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून जी एस ओ पी ( प्रमाणित कार्य पद्धती) तयार केली आहे त्यात काही बदल करन्याबाबत ही समिती काम करणार आहे. या समितीत उप वन संरक्षक, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ व निवासी जिल्हाधिकारी राहणार आहेत.

साकव पूल कोणाचा ?

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोणाचा व तो कोणी बांधला याबाबत आता तू तू मै मै सुरू झाली आहे. हा पूल जिल्हा परिषद यांनी बांधला असल्याचे समोर आले आहे. पण जिल्हा परिषद आम्ही हा पूल बांधला नसल्याचे सांगत आहे. व ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट करत आहे. मात्र आता जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात हा पूल कोणी बांधला हे स्पस्ट होणार असून, त्यानंतर संबंधित यंत्रणेवर कारवाई होणार आहे.

Web Title: Pune collector order to remove all ddangerous bridge in pune district after kundmala accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Accident
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
1

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
2

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
4

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.