Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मोठा गाजावाजा करत पालिकेने ‘ही’ पाणी योजना राबवली; मात्र दोन वर्षे झाली तरीही…

मोठा गाजावाजा करून राबविलेली महापालिकेची चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेची मुदत संपून दोन वर्षे उलटूनही या योजनेचे काम अपूर्णच असल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 22, 2025 | 02:35 AM
Pune News: मोठा गाजावाजा करत पालिकेने ‘ही’ पाणी योजना राबवली; मात्र दोन वर्षे झाली तरीही…
Follow Us
Follow Us:

पुणे: पाण्याची गळती रोखण्यासाठी आणि शहराच्या सर्व भागांना समान पाणीपुरवठा योजना करण्यासाठी महापालिकेने 24 बाय 7 ही योजना राबविली आहे. या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी 2018 मध्ये सुरवात झाली. पाच वर्षांच्या कालावधीत म्हणजे मार्च 2022 पर्यंत या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत होते.

मात्र, मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याचे सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीवरून समोर आले आहे. या योजनेवर आतापर्यंत दीड हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. या कामाचा स्कोप 25% नी कमी करूनही हे काम मार्च 2026 पर्यंत रेंगाळणार असे मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.

मोठा गाजावाजा करून राबविलेली महापालिकेची चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेची मुदत संपून दोन वर्षे उलटूनही या योजनेचे काम अपूर्णच असल्याचे समोर आले आहे. अद्यापही जवळपास 20 टक्के काम शिल्लक असून ते पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

हेही वाचा: Pune News: ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली; टॅंकर व्यावसाियकांवर पालिकेचा ‘वाॅच’ राहणार का?

योजनेची सध्या सद्य:स्थिती

– या योजनेतंर्गत बांधण्यात येणार्‍या एकूण 86 टाक्यांपैकी सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही 60 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 26 टाक्यांची कामे बाकी आहेत.
– मध्यवर्ती पेठांमधील पाणी मीटर बसविण्याचे काम फक्त 67 टक्के मीटर्स बसले असून पाईप लाईनचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे.
– लोहगाव, धानोरी, कळस या भागातील कामाची सद्यस्थिती बघता 93% काम पूर्ण झाले आहे.
– वारजे भागात 82 टक्के मीटर्स बसले असून पाईप लाईनचे काम 97% पूर्ण झाले आहे.
– कॅन्टोन्मेंट भागात फक्त 51 टक्के मीटर्स बसले असून पाईप लाईनचे काम फक्त 11 टक्के पूर्ण झाले आहे.
– वडगाव भागात 87 टक्के मीटर्स बसले असून 97 टक्के पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे.

ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली

जानेवारी महिन्यातच पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे आकडेवारीतून समाेर आले आहे.  गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यातच टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. खासगी टॅंकर व्यावसाियकांवर महापािलकेचे काेणतेही नियंत्रण नाही, परंतु महापालिकेच्या ठेकेदारी पद्धतीवरील टॅंकरवर तरी कर्मचाऱ्यांचा ‘वाॅच’ राहणार का ? याचे उत्तर पुढील काळात मिळेल.

महापालिकेच्या टँकर पॉइंटवरून जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविण्यात आले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात पुरविलेल्या टँकरच्या तुलनेत ही संख्या ७ हजार ११२ने जास्त आहे. ज्या भागात महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कार्यरत नाही, यंत्रणा असुनही अपुरा पाणी पुरवठा हाेताे अशा भागात  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत. एका ठेकेदाराकडे कमीत कमी आठ टँकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे.

 

Web Title: Pune corporation 24 hours water supply scheme but work not completed before 2 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Water problem

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
2

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
4

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.