Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम

Pune News: पाणी कपातीच्या कालावधीत सार्वजनिक आणि खासगी वाहन धुलाई केंद्रे (वॉशिंग सेंटर) बंद ठेवावी लागणार आहेत. अशी केंद्रे सुरू आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 09:19 PM
पाणी बचतीसाठी महापालिकेचे महत्त्वाचे निर्णय

पाणी बचतीसाठी महापालिकेचे महत्त्वाचे निर्णय

Follow Us
Follow Us:
  • पाणी बचतीसाठी महापालिकेचे महत्त्वाचे निर्णय
  • सोसायट्यांनाही पाणी बचतीची सक्ती
  • पाण्याची नासाडी केल्यास दंडात्मक कारवाई
Pune News/Maharashtra Drought 2026: पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर आता पुणे महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाणी कपातीच्या काळात वॉशिंग सेंटर बंद ठेवण्यासह जलतरण तलाव, खासगी उद्याने, बांधकामे आणि रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याच्या (Drought) वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे दोन वेळा उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येणार असून, तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी यासंदर्भात कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. पाणीपुरवठा विभागासह क्षेत्रीय कार्यालये, उद्यान, बांधकाम विकास, भवन रचना आणि पथ विभागांवर या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?

पाणी कपातीच्या कालावधीत सार्वजनिक आणि खासगी वाहन धुलाई केंद्रे (वॉशिंग सेंटर) बंद ठेवावी लागणार आहेत. अशी केंद्रे सुरू आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. मात्र, खासगी बोअरवेल किंवा विहिरींचे पाणी वापरणाऱ्या केंद्रांना रविवार, मंगळवार आणि गुरुवार असे आठवड्यातील तीन दिवस सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगी आणि सार्वजनिक जलतरण तलाव तसेच खासगी उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियम मोडल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे

शहरातील इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे आणि रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांसाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. या कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी किंवा बोअरवेल, विहिरींच्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांना दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच संबंधित बांधकाम थांबविण्याची कारवाईही केली जाणार आहे.

अनधिकृत नळजोडांवर कारवाई

अनधिकृत नळजोड आढळल्यास तो तत्काळ बंद करून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुन्हा अनधिकृत नळजोड घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास एक हजार रुपये, तर टँकरमधून पाण्याची गळती होत असल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. पाणीपुरवठा वाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

सोसायट्यांनाही पाणी बचतीची सक्ती

खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमधील बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानांसाठी आणि स्वच्छतागृहांतील फ्लशिंगसाठी करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. पाण्याच्या टाक्या भरून वाहू नयेत, यासाठी स्वयंचलित फ्लोट व्हॉल्व्ह बसविण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करावा, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पाणीपुरवठा विभागाला सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. अंमलबजावणीत हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास काय कारवाई होणार?

    Ans: दोनदा उल्लंघन केल्यास दंड तर तिसऱ्यांदा थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

  • Que: सोसायट्यांसाठी काय नियमावली असणार आहे?

    Ans: प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानांसाठी आणि स्वच्छतागृहांतील फ्लशिंगसाठी करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

Web Title: Pune corporation take strict action water wastage in pune city drought 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Diwali 2026: महागाईतही पुणेकरांची दिवाळी गोड, बाजारात खरेदीचा उत्साह; मिठाई, फराळाच्या दरांत तब्बल…
1

Diwali 2026: महागाईतही पुणेकरांची दिवाळी गोड, बाजारात खरेदीचा उत्साह; मिठाई, फराळाच्या दरांत तब्बल…

Maval Agricultural News: मावळात बाळा भेगडेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
2

Maval Agricultural News: मावळात बाळा भेगडेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Pune MLC Election 2026: हर्षदा देशमुख अन् कौस्तुभ गावडेंच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे बदलली; सविस्तर राजकीय विश्लेषण
3

Pune MLC Election 2026: हर्षदा देशमुख अन् कौस्तुभ गावडेंच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे बदलली; सविस्तर राजकीय विश्लेषण

Health News: पुण्यातील रुग्णालयांचे धाबे दणाणणार? केवळ २० टक्के हॉस्पिटल्सकडून नियमांचे पालन
4

Health News: पुण्यातील रुग्णालयांचे धाबे दणाणणार? केवळ २० टक्के हॉस्पिटल्सकडून नियमांचे पालन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.