Porsche Car Accident: 'या' आरोपामुळे अगरवाल पती-पत्नीला दिलासा नाहीच; कोर्टाने जामीन फेटाळला
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे अपघाताचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर घडलेल्या घडामोडी देखील सर्वानी पहिल्या आहेत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपी असलेल्या मुलाची वैद्यकीय चाचणी होण्याआधी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा आरोप आरोपीच्या आई-वडील आणि ससून हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांवर होता. त्याप्रकरणी ते सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान या सर्व आरोपींची जामिनासाठी कोर्टात याचिका केली होती. दरम्यान कोर्टाने या सर्व आरोपींची जामीन याचिका फेटाळून लावली आहे.
पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर घडलेला घटनाक्रम आपण पाहिला आहेच. दरम्यान आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वैद्यकीय चाचणीआधी रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपाखाली आरोपीची आई शिवानी अगरवाल, वडील विशाल अगरवाल आणि ससून हॉस्पिटलचे डॉ. अजय तावरे यांच्यासह काही जण तुंरुगात आहेत. या सर्व आरोपींची पुणे कोर्टात जामिनासाठी याचिका केली होती.
पुणे कोर्टात जामिनासाठी शिवानी अगरवाल, विशाल अगरवाल, डॉ. विजय तावरे यांच्यासह अन्य आरोपींची अर्ज केला होता. मात्र पुणे कोर्टाने या सर आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. दरम्यान या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे. मुंबई हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
१९ मे २०२४ रोजी कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शीख दिली. या शिक्षेवरून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गाडी चालवण्याआधी आरोपीना पबमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर त्याचे वडील विशाल अगरवाल व आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना देखील अटक करण्यात आली होती. सध्या अल्पवयीन आरोपी आणि आजोबांना जामीन मिळाला आहे. मात्र आरोपीचे आईवडील अजूनही तुरुंगातच आहेत.