Pune Ganpati Visarjan: तब्बल २८ तासांनी संपली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक; शेवटचे मंडळ अखेर मार्गस्थ
पुणे: काल अनंत चतुर्दशी दिवशी सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक अखेर संपली आहे. पुण्यातील गणती विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती अखेर अल्का चौकातून मार्गस्थ झाला आहे. पुण्यातील शेवटचा गणपती मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहे. काल सकाळी सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक अखेर आज संपली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही तब्बल २८ तासांपेक्षा जास्त काळ चालली आहे. १८० पेक्षा जास्त गणेश मंडळे अल्का चौकातून मार्गस्थ झाली आहेत.
काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा अशा ५ मानाच्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळच्या सुमारास पार पडले. त्यानंतर पुणेकरांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकांसाठी पारंपरिक ढोल ताशा वादन करण्यात आले. अनेक मंडळांनी वेगवेगळे गोष्टी सादर करून पुणेकरांची मने जिंकली. पुण्यातील गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही तब्बल २८ तासांपेक्षा जास्त काळ चालली आहे. १८० पेक्षा जास्त मांडले अलका चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहेत.
विसर्जन मिरवणुकीत अनेकांवर उपचार
गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाल्यापासून सकाळपासून उन्हाचा चटका चांगलाच असल्याने तापत्या झळा उन्हाच्या झेलीत गणेशभक्त मिरवणुकीतून पुढे जात आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीतील गणेश भक्तांना काही त्रास झाल्यानंतर वेळीच योग्य ते प्राथमिक उपचार करण्यासाठी विघ्नहर्ता न्यासतर्फे व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यावेळी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तसेच सकाळपासून उन्हाचा जोरही जास्त असल्याने चटके बसत होते. प्रचंड गर्दी आणि उन्हाचे चटके यामुळे मिरवणुकीतील भक्तांना त्रास होत होता. ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून, मंगळवारी 122 गणेशभक्तांवर उपचार करण्यात आले. विघ्नहर्ता न्यासतर्फे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी व्यवस्था करण्यात येते.