Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GBS Update: पुण्यात हाहाःकार! रुग्णांची शंभरी पार; 16 जण व्हेंटिलेटर, मुरलीधर मोहोळांनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 28, 2025 | 02:18 PM
GBS Update: पुण्यात हाहाःकार! रुग्णांची शंभरी पार; 16 जण वेंटिलेटरवर, मुरलीधर मोहोळांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

GBS Update: पुण्यात हाहाःकार! रुग्णांची शंभरी पार; 16 जण वेंटिलेटरवर, मुरलीधर मोहोळांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येने शतक ओलांडले असून  १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथेही उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचे तीन निर्णय झाले

पुण्यात जीबीएसचे वाढते रुग्ण पाहता महानगर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोमचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जातायत. अशातच पुणेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

हेही वाचा: Pune GBS Update: गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल

यामध्ये  पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार,  खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे,  कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे , अशा या निर्णयांचा समावेश आहे. जीबीएसचे रुग्ण दाखल असलेल्या नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून किती बिल घेतलं जातंय, यावर हे मेडिकल ऑफिसर लक्ष ठेवणार आहे. रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले तर त्यांच्यावर कारवाई देखील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

WHO ने सांगितले आजाराबाबत 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेच्या एका भागावर हल्ला करते. या सिंड्रोममध्ये, स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या आणि वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना वाहणाऱ्या नसा प्रभावित होतात, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पाय आणि/किंवा हातांमध्ये संवेदना कमी होतात आणि गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.

हेही वाचा:  पुण्यात हाहाःकार! धोका वाढला; GBS च्या रुग्णात वाढ, 73 जणांना बाधा तर 14 जण वेंटिलेटरवर

महामारी आहे का?

ही एक दुर्मिळ स्थिती आहे आणि जरी ती प्रौढ आणि पुरुषांमध्ये अधिक सामान्य असली तरी, सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. अधिकाऱ्यांनी जनतेला माहिती दिली आहे की गुइलेन-बॅरे सिंड्रोम धोकादायक आहे, परंतु त्यामुळे महामारी किंवा जागतिक साथीचा रोग होऊ शकत नाही. हा आजार वेळीच उपाय करून बरा करता येतो. मात्र त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे आणि योग्य ती यंत्रणा असणेही गरजेचे आहे.

 

Web Title: Pune guillain barre syndrome more than hundred patients 16 on ventilators minister mohol take big decisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • GBS virus
  • Health News
  • Pune

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
4

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.