Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…

पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 06, 2025 | 02:35 AM
Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड...

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड...

Follow Us
Close
Follow Us:
गणेशोत्सवात पुणेकरांची मेट्रोला पसंती
दोन दिवस दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार
पुणेकरांचा प्रवास जलद होणार

पुणे: गणेशविसर्जनानिमित्त ६ व ७ सप्टेंबर रोजी पुणे मेट्रो प्रवाशांसाठी एक खास उपक्रम राबवणार आहे. या दोन दिवसांत मेट्रो सेवा सलग ४१ तास अखंड सुरू राहणार आहे. दर सहा मिनिटाला मेट्रो उपलब्ध असेल. हा निर्णय मुख्यतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.सणासुदीच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सुरक्षित आणि जलद पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

विशेष म्हणजे, या सेवेत मेट्रो रात्रीसुद्धा उपलब्ध राहील. त्यामुळे मध्यरात्री दर्शनाला जाणारे किंवा उशिरा परतणारे भक्त सहजतेने मेट्रोचा लाभ घेऊ शकतील. मेट्रो प्रशासनाकडून सुरक्षा, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयींसाठी विशेष पावले उचलली गेली आहेत. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, प्रत्येक स्थानकावर अधिकृत सहाय्यकही तैनात राहतील. तसेच ऑनलाइन तिकीटंही उपलब्ध असेल.

पुणेकरांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळून नागरिकांना जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल. उत्सवाच्या दिवसांत रस्त्यावरची वाहतूक कमी करून प्रदूषणावरही काही प्रमाणातु नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. पुणे मेट्रोचा हा उपक्रम गणेश भक्तांसाठी तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’

पुणे शहरात मध्यवर्ती भागात कसबा, मंडई आणि स्वारगेट येथे मेट्रो सुरू झाल्याने मोठ्या संख्येने भाविक हे मेट्रोचा प्रवास करत आहेत. दररोज सुमारे दोन लाख मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गणेशोत्सवात वाढ झाली असून, गणेशोत्सवात तब्बल तीन लाखांहून अधिक प्रवासी हे मेट्रोने प्रवास करत आहे, अशी माहिती मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर यांनी दिली. गणेशोत्सवाच्या आधी दररोज सव्वा दोन लाख मेट्रोने प्रवास करत होते. आत्ता ती संख्या वाढली असून, आत्ता गणेशोत्सवात दररोज तब्बल तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी प्रवास करत आहे.

गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’; दिवसाला तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक करताहेत प्रवास
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे. याबाबत मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर म्हणाले की, मेट्रो प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियोजन करण्यात आलं असून, दिवसभरात ५५४ फेऱ्या मेट्रोच्या दोन्ही मार्गावर होत होत्या. पण गणेशोत्सवात गणेश भक्तांची वाढती संख्या पाहता मेट्रो दिवसभरात ७४० फेऱ्या पूर्ण करत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे’.

Web Title: Pune metro continue 41 hours service to punekar people ganesh festival marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
3

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
4

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.