Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महामेट्रोचे मोठे गिफ्ट; Pune Metro ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Pune Metro: महामेट्रोकडे तीन डब्यांचे एकूण ३३ रेक असून, त्यापैकी सध्या ३० रेक नियमित सेवेत आहेत. पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो चालविण्यासाठी सर्व ३३ रेक सेवेत आणण्यात येणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 06, 2026 | 02:35 AM
पुणे मेट्रोची वारंवारता वाढवणार

पुणे मेट्रोची वारंवारता वाढवणार

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सवात दर पाच मिनिटांनी मेट्रो
गर्दीच्या वेळेत फेऱ्या वाढवल्या जाणार 
गर्दी नसलेल्या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार

Pune Metro: मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. या नियोजनाची गेल्या तीन दिवसांपासून चाचणी सुरू असून, चाचण्या यशस्वी होत असल्याचे महामेट्राकडून सांगण्यात आले.

सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध आहे. गणेशोत्सवापासून ही वारंवारता पाच मिनिटांवर आणण्यात येणार आहे. तर, गर्दी नसलेल्या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महामेट्रोकडे तीन डब्यांचे एकूण ३३ रेक असून, त्यापैकी सध्या ३० रेक नियमित सेवेत आहेत. पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो चालविण्यासाठी सर्व ३३ रेक सेवेत आणण्यात येणार आहेत. वनाझ-रामवाडी मार्गावर १७, तर पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर १६ रेक धावतील.
दोन्ही मार्गिकांवर सध्या दररोज सुमारे २.४० ते अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत. सध्या दररोज ५५४ फेऱ्यांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते. वारंवारता पाच मिनिटांवर आणल्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढणार असून, त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.

आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास

मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी सेवा देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी चाचण्या सुरू आहेत.
— श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

मेट्रो सेवेतील बदल :
बाब.                                                   माहिती
महामेट्रोकडे एकूण रेक.                           ३३
सध्या नियमित सेवेत.                               ३०
वनाझ-रामवाडी मार्गावरील रेक.                १७
पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावरील रेक.      १६
दैनंदिन सरासरी प्रवासीसंख्या.           सुमारे २.४० लाख
सध्याची गर्दीच्या वेळेतील वारंवारता.        ६ मिनिटे
गणेशोत्सवापासून प्रस्तावित वारंवारता.     ५ मिनिटे
विना गर्दीच्या वेळेतील वारंवारता.             १० मिनिटे

वाहतूक कोंडीचा ‘द एंड’! लवकरच ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम वेगाने सुरु आहे. या कामाची पाहणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

Web Title: Pune metro increase frequency in pcmc and swargate pune lines for ganeshotsav 2026 relief to peoples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Leopard News: CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार
1

Leopard News: CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदीचा ‘ट्रेंड’! शाडूच्या मूर्तीं, पूजा साहित्या अन्…
4

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदीचा ‘ट्रेंड’! शाडूच्या मूर्तीं, पूजा साहित्या अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.