हिंजवडी ते बालेवाडी बाणेर मेट्रो लवकर दिवाळीपर्यंत सुरु व्हावी अशी आयटी कर्मचाऱ्यांची मागणी केली (फोटो - सोशल मीडिया)
Hinjewadi Metro News : पिंपरी: पुणे शहरामध्ये मेट्रो सुरु झाली असून मार्ग विस्तारण्यास देखील मंजूरी देण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या उत्पन्नामध्ये देखील मोठी वाढ झाली असून पुणेकर मोठ्या उत्साहाने मेट्रोचा वापर करत आहेत. हिंजवडी ते बाणेर या मार्गावरील मेट्रो लवकर सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने पीएमआरडीएकडे या संदर्भात पाठवले पत्र पाठवले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन तीनचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. त्यामुळे मार्च २०२६ मध्ये या मार्गावर मेट्रो धावणार आहे. मात्र, हिंजवडी ते बालेवाडीपर्यंत तीन महिन्यांत मेट्रो सुरू होऊ शकते. वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा मार्ग लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा बाणेरपर्यंतचा टप्पा दिवाळीपूर्वी सुरू करावा, अशी मागणी शहरातील आयटी कर्मचाऱ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली आहे. हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’च्या माध्यमातून पत्राद्वारे ही विनंती केली गेली. परंतु पीएमआरडीए कडून मार्च २०२६ मध्ये संपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार असे सांगण्यात आले. हिंजवडी ते बाणेर मेट्रो टप्प्याची वेळेत सुरूवात केल्यास शहरातील आयटी कर्मचाऱ्यांचे प्रवास सुखकर होईल. वाहतूक कोंडी कमी होणे, वेळेची बचत आणि दिवाळी–नाताळच्या निमित्ताने कामगारांना दिलासा मिळेल या सगळ्याच बाबतीत हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या माहितीप्रमाणे मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण मार्गिकेची कार्यवाही सुरू होईल. मात्र, हिंजवडीतील रस्ते व वाहतूक कोंडी पाहता, फक्त हिंजवडी ते बाणेर हा टप्पा लवकर सुरू करणे आवश्यक असल्याचे आयटी कर्मचाऱ्यांचे मत आहे. सध्या हिंजवडी आणि बाणेरमध्ये सुमारे १.५ ते २ लाख आयटी कर्मचारी काम करतात. यातून अनेकजण हिंजवडी, वाकड, बालेवाडी या भागात राहतात. बाणेरपर्यंत मेट्रो सुरू झाल्यास प्रवाशांचे वेळ व प्रवासाचे तास वाचणार आहेत, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर थेट सकारात्मक परिणाम होईल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तीन आठवड्यांपूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माण ते बालेवाडी (सुमारे १२–१४ किलोमीटर) या टप्प्याची यशस्वी चाचणी पार पडली. या चाचणीने मेट्रो पहिल्यांदाच हिंजवडीच्या बाहेर धावण्यास सुरुवात केली. पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले की, अंतिम टप्प्यातील स्टेशन व इतर कामे पूर्ण झाली असून, मार्च २०२६ मध्ये संपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार आहे.
फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले, “दिवाळी व नाताळच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी ते बाणेर टप्पा लवकर सुरू करावा; त्यामुळे लाखो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. प्रवासाच्या तास व कामाचे वेळ वाचवणे हा सर्वांत मोठा फायदा होईल.” असे त्यांनी मत मांडले आहे.