Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: आधी रस्ते दुरुस्तीसाठी काेट्यावधींचा खर्च अन् पुन्हा ‘या’ कारणासाठी करणार खोदाई; पालिकेचे नेमके चाललंय तरी काय?

महापालिकेने गेल्याच वर्षी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढून शहरातील प्रमुख शंभर किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षे त्याचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2025 | 02:35 AM
Pune News: आधी रस्ते दुरुस्तीसाठी काेट्यावधींचा खर्च अन् पुन्हा 'या' कारणासाठी करणार खोदाई; पालिकेचे नेमके चाललंय तरी काय?

Pune News: आधी रस्ते दुरुस्तीसाठी काेट्यावधींचा खर्च अन् पुन्हा 'या' कारणासाठी करणार खोदाई; पालिकेचे नेमके चाललंय तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: रस्ते दुरुस्तीसाठी काेट्यावधी रुपये खर्च करा आणि पुन्हा खाेदाई करून पुणेकरांना खड्डयात ढकला हा एक कलमी कार्यक्रम पुणे महापािलकेचा सुरु आहे. पंधरा रस्ते दुरुस्ती केल्यानंतर आता १७ रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असतानाच, अाॅप्टीक फायबर केबल टाकण्यासाठी शहरातील रस्त्यांची सुमारे ५०० किलाेमीटर इतकी खाेदाई केली जाणार आहे.

नैसर्गिक आपत्तीवर  लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून शहरात इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी शहरात ऑप्टिक फायबर केबल (ओएफसी) टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरातील सुमारे ५०० किलोमीटरचे रस्ते खोदाई करावी लागणार आहे. या कमांड सेंटरमधून सर्व कार्यालये, शाळा आणि रुग्णालये इंटरनेटद्वारे जोडली जाणार आहेत. यासाठी महापालिका ‘महाप्रीत’ शासकीय संस्थेसोबत शहरात ऑप्टीकल फायबर टाकणे, इंटीग्रेटेड कमांड अॅड कंट्रोल सेंटर उभे करण्याबाबतचा करार झाला आहे.

महापालिकेने गेल्याच वर्षी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढून शहरातील प्रमुख शंभर किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षे त्याचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असणार आहे. याच रस्त्यावर प्रमुख सिग्नल, सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रूमशी जोडण्यासाठी रस्ते खोदाई करावी लागणार आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांवर नाराजी व्यक्त केली हाेती. तसेच पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सातत्याने रस्त्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या हद्दीतील ३२ व्हीअायपी रस्त्यांचे काम प्राधान्याने करण्याचे ठरले हाेेते. त्यानुसार पंधरा रस्त्यांचे काम पुर्ण झाले असुन, १७ रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार अाहे. एकीकडे रस्ते दुरुस्तीकरीता काेट्यावधी रुपये खर्च केले जात आहे. त्याचवेळी रस्त्यांच्या खाेदाईचा घाट घातला जात आहे. यामुळे पुणेकरांची खड्डयातून मुक्तता हाेणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांनी घेतला पाणीपुरवठ्याचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश

कंट्राेल रुमसाठी ५४ काेटी रुपयांचा निधी आवश्यक 

केंद्र सरकारकडून २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद या सात शहरांसाठी शहरी पूर जोखीम व्यवस्थापन (अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट) योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेतून पुण्यासाठी २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १४ व्या आणि १५व्या वित्त आयोगातून पुणे शहराला हा निधी उपलब्ध होणार आहे. कंट्राेल रुम उभारण्यासाठी ५४ काेटी रुपयांचा निधी अावश्यक आहे.

शहरात पाचशे किलोमिटर रस्ते ऑप्टीकल फायबर टाकण्यात येणार असून यासाठी संबंधित ठेकेदारावर सवलतींची खैरात वाटण्यात आली आहे. रस्ते खोदाई शुल्क माफ, त्याचबरोबर नफामध्ये मोठी भागीदार, करार कराताना ठेकेदराच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. रस्तेखोदाईची परवानगी देताना प्रति मीटर दहा हजार रुपये इतके शुल्क आकारले जाते. मात्र यातून कोणतेही शुल्क महापालिकेला मिळणार नाही. यामुळे पाचशे कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

-विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Web Title: Pune municipal corporation to dig up city roads to lay optic fiber cables

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Central government
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
1

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
2

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
4

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.