Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदीचा ‘ट्रेंड’! शाडूच्या मूर्तीं, पूजा साहित्या अन्…

Ganesh Chaturthi 2026: पुण्यातील मध्यवर्ती पेठांपासून उपनगरांपर्यंत गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी काही ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 02:35 AM
पुणेकरांची गणेशोत्सवाची तयारी आता ऑनलाइन

पुणेकरांची गणेशोत्सवाची तयारी आता ऑनलाइन

Follow Us
Follow Us:
  • बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाची लगबग वाढली 
  • विविध वस्तूंची ऑनलाइन बुकिंगचे प्रमाण वाढते 
  • पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली 
पुणे/गायत्री पवळे: गणेशोत्सवाची लगबग सुरू होताच बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मात्र, यंदा गणेशमूर्ती आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीची पद्धतही बदलताना दिसत आहे. पारंपरिक दुकानांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मूर्ती निवडण्याबरोबरच पुणेकरांकडून आता शाडूच्या गणेशमूर्तींपासून पूजेच्या साहित्यापर्यंत विविध वस्तूंची ऑनलाइन बुकिंग केली जात आहे. विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म, स्थानिक विक्रेत्यांचे सोशल मीडिया पेज आणि मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून मूर्ती आरक्षित करून घरपोच मागविण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

विशेषतः पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढत असल्याने शाडू मातीच्या मूर्तींचे फोटो, आकार, रंगसंगती आणि किमती ऑनलाइन पाहून त्यानुसार मूर्तीची निवड केली जात आहे. काही मूर्तिकारांकडून सोशल मीडियावर मूर्तींचे कॅटलॉग उपलब्ध करून दिले जात असून, ग्राहकांकडून ऑनलाइन आगाऊ नोंदणीही स्वीकारली जात आहे. त्यामुळे मूर्तिकार आणि ग्राहक यांच्यातील व्यवहाराची पद्धतही बदलत आहे.

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी

यासोबतच गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले दूर्वा, फुले, हार, पत्री, पूजेचे साहित्य, नैवेद्याचे साहित्य, आरतीची पुस्तके तसेच सजावटीच्या वस्तू यांचीही ऑनलाइन ऑर्डर केली जात आहे. घरातूनच विविध वस्तूंची निवड करून एकाच ठिकाणी ऑर्डर देण्याची सुविधा मिळत असल्याने विशेषतः नोकरी करणारे आणि वेळेअभावी धावपळ करणारे नागरिक या पर्यायाला पसंती देत आहेत.

पुण्यातील मध्यवर्ती पेठांपासून उपनगरांपर्यंत गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी काही ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळत आहेत. त्यामुळे पारंपरिक गणेशोत्सवाच्या बाजारपेठेला डिजिटल बाजारपेठेची जोड मिळाली आहे.

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

दरम्यान, ऑनलाइन खरेदी करताना मूर्तीचा आकार, शाडू मातीचा वापर, रंग, विसर्जनाची पद्धत, डिलिव्हरीची वेळ आणि पॅकेजिंग यांची माहिती ग्राहकांनी तपासणे आवश्यक आहे. विशेषतः नाजूक गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांकडून सुरक्षित पॅकिंग आणि वेळेत घरपोच सेवा देण्यावर भर दिला जात आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेतील गणेशोत्सवाची पारंपरिक खरेदी कायम असली, तरी ऑनलाइन बुकिंग आणि घरपोच सेवेने पुण्याच्या गणेशोत्सवाच्या खरेदीला नवा डिजिटल आयाम मिळाला आहे.

Web Title: Pune peoples ganesh chaturthi 2026 pune online ganpati idol shopping trends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganesh Festival
  • Online Sale
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…
1

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी
2

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
3

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
4

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.