Pune Police Damini Dal helps a student who is depressed due to her parents divorce
पुणे : अक्षय फाटक : वडील क्लासवन अधिकारी अन् आई, उच्चशिक्षीत पण गृहिणी. त्यांना एकच मुलगी. ती इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळेत दहावीच्या वर्गात. मुलगी वर्गातील हुशार व टॉपर विद्यार्थीनी. मात्र, ती अचानक गेल्या काही महिन्यांपासून शांत-शांत व कोणाशी बोलत नाही आणि काही सांगतही नाही, ही बाब शिक्षकांनी हेरली. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या दामिनी मार्शलच्या ‘दीदी’ महिला पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांना सांगितली. लागलीच हिंगे यांनी शाळेत मार्गदशन पर शिबीर घेत काही अडचण असल्यास सांगण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर अचानक एका मुलीचा त्यांना फोन आला अन् “दीदी, मला तुमच्या मदतीची गरज आहे”, अशी विनंती केली. पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांनी तत्काळ तिच्याकडे जात ‘बोल, काय मदत हवी’ अशी विचारणा केली. तेव्हा तिने, मला घर सोडून जायचे आहे, असे सांगत कहाणी सांगितली.
तिचे हे सर्व एकूण सोनाली हिंगे यांनाच गहिवरून आले. त्यांनी तत्काळ तिच्या आई-वडिलांना बोलवले व तिच्या मनाची घालमेल दाखवून दिली. तेव्हा आई-वडिलही मुलीच्या प्रेमापुढे झुकले. त्यांनी त्याक्षणी घटस्फोटाचा निर्णय बदलत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने पोलिस, शिक्षक अन् दाम्पत्यासह मुलीचे डोळे पानावले. विभक्त होणाऱ्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचे कारण आणि नैराश्यातून घरातून निघून जाण्याच्या मानसिकतेत असलेल्या मुलीला पुन्हा विचार बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संबंधित मुलगी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. ती वर्गातील टॉपर आहे. अत्यंत खेळकर चालती बोलती. पण ती अचानक शांत-शांत राहू लागली. दरम्यान, पुणे पोलिसांच्या दामिनी मार्शलकडून ‘पोलिस दीदी’ या उपक्रमाअंर्तगत शाळा व महाविद्यालयात मार्गदर्शन केले जाते. ‘बॅड टच, गुड चट’ तसेच काही अडचणी असल्यास फोन करण्याचे व सांगण्याचे आवाहन केले जाते.
दरम्यान, ही मुलगी शांत राहत असल्याने शाळेतील शिक्षक व प्राचार्यांना जाणवले होते. त्यांनी ही गोष्ट पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांना सांगितली. हिंगे यांनी एक सत्र शाळेत घेत कोणाला अडचण किंवा काही सांगयचे असेल तर मला फोन करा. एक ताई व मैत्रिणी म्हणून विश्वासाने मला सांगा, मी मदत करेल, असे आवाहन केले होते. नंतर मुलीने हिंगे यांना फोन केला व दीदी मला तुमच्या मदतीची गरज आहे, अशी विनंती केली. हिंगे यांनी तत्काळ तिची भेट घेत विचारपूस केली तेव्हा मुलीने मला घर सोडून जावे वाटते. मी घरातून बॅग व कपडे घेऊन आले असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चौकशीत मुलीचे आई-वडील गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून वेगळे राहत होते. त्यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. मुलगी वडिलांकडे राहत होती. अचानक आई-वडिलांनी घेतलेला निर्णायाचा व झालेल्या बदलाचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. ती नैराश्यात होती. त्यातूनच तिला घर सोडून कुठे तरी निघून जावे, असे वाटू लागले होते. तिने तसा निर्णय घेतला. ती सोमवारी घरातून कपडे घेऊन बाहेरही पडली असल्याचे चौकशीतून समोर आले. परंतु, महिला शिपाई हिंगे यांनी तिची समजूत काढली. तिच्या मनातील विचार बदलले. मन परिवर्तन केले. नंतर तिच्या आई-वडिलांना देखील बोलवून घेतले.
शाळेचे प्राचार्यासमोर महिला शिपाई हिंगे यांनी आई-वडिलांना परिस्थितीची जाणीवकरून दिली. मुलीवर झालेल्या परिणाम व तिने घेतलेला आजचा निर्णय त्यातून पुढील धोके याची माहिती दिली. मुलीचं तुमच्या दोघांवर असलेले प्रेम व तिची आयुष्य याची जाणीव करून देत त्यांना समजावून सांगितले. तेव्हा मुलींच्या प्रेमापुढे आई-व़डिलही झुकले आणि त्यांनी त्याचक्षणी घटस्फोटाचा निर्णय बदलत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुलगी आई-वडिलांना पुन्हा एकत्र येत असल्याचे पाहून आनंदून गेली. तिचा तो आनंद पाहून प्राचार्य, हिंगे, व आई-वडिलांचे डोळे पानावले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.