निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का (फोटो- ani )
Local Body Elections: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेना पक्षातील एक बडा नेता त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्या आधीच शिसवेनेतील हा बडा नेता शिंदेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपने तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडीने देखील निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. दरम्यान सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. दरम्यान आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाजी सावंत हे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे भाऊ असल्याचे समजते आहे. शिवाजी सावंत हे भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणजे महायुतीमधील पक्षांमध्ये फोडाफोडी सुरू झाली आहे का? अशी प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे लवकरच शिवसेनेला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. शिवाजी सावंत भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवाजी सावंत हे आमदार तानाजी सावंत यांचे बंधु आहेत. शिवाजी सावंत हे भाजपमध्ये गेल्यास शिवसेनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार!
राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याचा अंदाज आहे. या निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. याआधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिरीष चौधरी हे अमळनेरचे माजी आमदार आहेत. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
लवकरच शिरीष चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. शिरीष चौधरी यांच्यासोबत जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिरीष चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. असे झाल्यास जळगाव, अमळनेरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.