
विनाहेल्मेट आणि पीयूसी संदर्भात सर्वाधिक नियमांचे उल्लंघन
आरटीओकडून साठ हजार जणांवर दंडात्मक कारवाई
वाहतूक व्यवस्थेसमोर आहेत अनेक आव्हाने
चंद्रकांत कांबळे/पुणे: बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांसह एकूणच वाहतूक व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. आरटीओ, वाहतूक पोलिस यांच्यासह शासकीय स्तरावर ही बेशिस्त थांबविण्यासाठी प्रयत्न होत असले तरी शहरातील अशा वाहनचालकांना रोखण्यात यश येत नाही.प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओच्या) फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर सन ०१ एप्रिल २०२५ ते ०५ जानेवारी २०२६ या कालावधीत, तब्बल ६० हजार ७२१ बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे भंग करण्यात सर्वाधिक प्रमाणात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई झाली आहे. हेल्मेट न घालणे (१३,०७८ प्रकरणे) आणि पीयूसी (७७४२ प्रकरणे) अशा ४९ विविध प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओकडून दंडात्मक करवाई करत १७ करोड १८ लाख २३ हजार दंड वसूली करण्यात आले आहे.
जीवाची नाही पर्वा
वेगमर्यादा ओलांडणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, अवैध विमा, सिग्नल तोडणे, चुकीचे पार्किंग, जास्त भार वाहतूक, गाडी चालवताना मोबाईल वापरणे, रिफ्लेक्टरशिवाय वाहन, टेल लॅम्प/ब्रेक लाइट निकामी, फॅन्सी नंबर प्लेट अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. बेशिस्त वाहनचालक आपल्यासह इतरांच्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत.
HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?
सार्वजनिक वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे,नियम हे कोणावरती बंधने नसून ते आपले कर्तव्य आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे या बाबी स्वतःसाठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहेत. हा केवळ दंडात्मक कारवाईचा विषय नाही, तर आयुष्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. प्रत्येकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
– स्वप्निल भोसले,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे
स्पीड गन (अतिवेग) २३४१
हेल्मेट १३०७८
सीट बेल्ट १०२३
अवैध विमा ६४०१
एमडीएल (३१८/५/१८०) २९०४
परवाना (६६/१९२A) १६८५
पीयूसी (११५/१९०(२)) ७७४२
फिटनेस ५५०३
सिग्नल जंपिंग / लेन कटिंग ४२०
चुकीच्या ठिकाणी पार्किंग ६८०
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे / धोकादायक वाहनचालना ८९६
ओव्हरलोड मालवाहतूक वाहन ११४९
वाहन चालवताना मोबाईलचा वापर १७८३
रिफ्लेक्टर नसलेले ३६८१
एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली ‘हे’ आवाहन
१ एप्रिल २०२५ ते ५ जानेवारी २०२६ पर्यत करण्यात आलेली दंडात्मक कारवाई
महिना दंड
एप्रिल १ करोड ५२ लाख ४० हजार
मे १ करोड ७८ लाख ९८ हजार
जुन १ करोड ७३ लाख ९९ हजार
जुलै १ करोड ७१ लाख ६५ हजार
ऑगस्ट १ करोड ५७ लाख ३५ हजार
सप्टेंबर १ करोड ७१ लाख २१ हजार
ऑक्टोबर १ करोड ६४ लाख ०५ हजार
नोव्हेंबर १ करोड ८५ लाख ४८ हजार
डिसेंबर १ करोड ८१ लाख ५८ हजार
जानेवारी १ करोड ८१ लाख ५८ हजार
एकूण १७ करोड १८ लाख २३ हजार