Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा गटनेता आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद वेगवेगळ्या नेत्यांकडे देण्याचा जुना पॅटर्न पुढे आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 05:49 PM
पुणे 'झेडपी'त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय

पुणे 'झेडपी'त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’
  • गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय
  • १८ मार्चला अध्यक्षपदाची निवडणूक होणार
पुणे : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा गटनेता आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद वेगवेगळ्या नेत्यांकडे देण्याचा जुना पॅटर्न पुढे आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (६ मार्च २०२६) झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी गटातून निवडून आलेले श्रीमंत ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

 

ही बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. बैठकीस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढोले यांचे पक्षातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्तही जाहीर झाला असून, येत्या १८ मार्च रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे सध्या पक्षात अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही कार्यकाळांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत गटनेता आणि अध्यक्षपद वेगवेगळ्या नेत्यांकडे देण्याची भूमिका घेतली होती. पक्षातील विविध गटांना प्रतिनिधित्व मिळावे आणि संघटनात्मक समतोल राखला जावा, या उद्देशाने हा पॅटर्न राबविण्यात आला होता. यंदाही त्याच पद्धतीचा अवलंब होत असल्याचे ढोले यांच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.

आता अध्यक्षपदासाठी कोणत्या नेत्याला संधी मिळणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढाले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचा तसेच सर्व सदस्यांना सोबत घेऊन मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी ‘या’ सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

Web Title: Ncp has taken a big decision regarding the post of group leader and president in pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Census 2026: १६ मे पासून प्रगणक तुमच्या दारी; प्रशासनाने आखली १०,१७२ परिमंडळे
1

Pune Census 2026: १६ मे पासून प्रगणक तुमच्या दारी; प्रशासनाने आखली १०,१७२ परिमंडळे

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम
2

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप
3

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा
4

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.