Pune sassoon hospital has no wheelchair for patiet video goes viral
सध्या पुण्यातील नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर येथे घडलेल्या एका घटनेने मोठा गोंधळ उडाला आहे. एका गर्भवती महिलेले पैशाभावी वेळेत उपचार मिळाला नाही, यामुळे प्रसूतिपूर्वी तिचा मृत्यू झाला. यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळलेली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यासाठी सहाआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन, गरीब रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेत उपाचार दिला जात नाही, उपचार दिला जात नाही असा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
याच दरम्यान पुण्यातील आणखी एका रुग्णालयाचा निर्दयीपणा उघड्यावर आला आहे. पूण्यातील आणखी एक नामांकित ससून रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने लोकांमध्ये तीव्र संताप उफाळला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्याने उपचार घेतल्यावर तो पायाच्या टाचा घासत रुग्णालयातून बाहेर पडत आहे. असे सांगण्यात येत आहे की, वार्डमधून रुग्णाला बाहेरप आणण्यासाठी हॉस्पिटलकडे व्हिलचेअर आणि स्ट्रेचर नाही. रुग्णाने अपघातात आपला पाय गमवला होता. यामुळे उपचारासाठी तो ससून रुग्णालयात आला होता. परंतु त्याला सोडायला रुग्णालयात व्हिलचेअर उपल्ब्ध नव्हती. रुग्णाला पाय घासत स्वत:हा बाहेर पडावे लागले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
रुग्णाच्या म्हणण्यानुसार, त्याचा पाय खराब होता. तो ड्रेसिंग बदलण्यासाठी रुग्णालयात गेला होता. त्याच्या पायाची ड्रेसिंग करुन देण्यात आली मात्र नंतर त्याला तिथून हाकलून लावण्यात आले. व्हिलेचअरही न दिल्यामुळे रुग्णाला घासत घासत बाहेर पडावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण नागपूरहून उपचारासाठी आला होता. परंतु त्याला रुग्णालयातून हाकलून लावण्यात आले.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेला आहे. या व्हिडिओने ससून रुग्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अनेकांनी हीच का रुग्णांची किंमत? , गरीब आहे म्हणून असं वागवणार का? असे अनेक प्रश्न लोकांनी विचारले आहेत. सध्या या व्हिडिओने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल हतो आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.