Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल लावण्यास आधीच विलंब केला आहे. त्यात आता १८७ विद्यार्थ्यांना ० मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2025 | 06:52 PM
अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क...

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क...

Follow Us
Follow Us:

पुणे/सोनाजी गाढवे : शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल लावण्यास आधीच विलंब केला आहे. त्यात आता १८७ विद्यार्थ्यांना ० मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शुभदा बागूल या विद्यार्थिनीने १९९ प्रश्न सोडवले होते, तरीही शून्य मार्क मिळाले आहेत. विशेष म्हणजे २०२२ च्या टेट परीक्षेत १०३ मार्क मिळाले होते. आता अधिक अभ्यासपूर्ण परीक्षा देऊनही ० मार्क कसे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत पुरावे हाती लागत असून, लवकरच कोर्टात जाऊ, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे.

टेट परीक्षेचा निकाल सोमवारी ( दि. १८ ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये अनेक विद्याथ्यर्थ्यांना मागील परीक्षेवेळी जेवढे गुण मिळाले तेवढेच गुण यावेळीही मिळाले आहेत. काही विद्यार्थ्यांना सन २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत ४२ गुण मिळाले होते. त्या विद्यार्थ्यांस या परीक्षेत १४८ गुण मिळाले आहेत. तर काही विद्याथ्यांचे गुण मागील परीक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने कमी झाले आहेत. परीक्षेत त्यामुळे घोळ असल्याचा आरोप भावी शिक्षकांतून होत आहे.

टेट परीक्षा घाईघाईत घेण्यात आली होती. मात्र, परीक्षा संपून अडीच महिने झाले तरीही निकाल लागला नव्हता. त्यामुळे परीक्षेचा निकाल तात्काळ लावावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार होत होती, मात्र, परीक्षेचा निकाल लावण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तीन महिन्यांचा कालावधी लावला. त्यामुळे या काळात बराच घोळ झाल्याचा दावा भावी शिक्षकांतून होत आहे.

आता लवकर नियुक्ती आणि समुपदेशन एकाच दिवशी पार पाडली गेली पाहिजे. त्यामुळे भावी गुरुजींना रोजगार उपलब्ध होईल. शासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर गुणवत्ता यादी आणि निवड यादी जाहीर करावी. काही उमेदवारांना मार्क कमी जास्त झाली आहेत. अशी शंका आलेली आहे. याची सखोल चौकशी करूनचं अतिंम यादी जाहीर केली तर बरं होईल. प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा भावी शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

टेट परीक्षा पार पाडली यावेळी गेल्या दोन भरतीमध्ये ज्यांना मार्क कमी होते त्यांना मात्र या वेळेला दुप्पट तिप्पट पट्टीने मार्क वाढलेले दिसून येत आहेत पण ज्यांचे मार्क दोन वेळा जास्त होते त्यांना अपेक्षापेक्षा खूपच कमी मार्क मिळाल्यामुळे प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला आहे. परीक्षा परिषदेच्या संदर्भात शंका उपस्थित होत आहेत. – शुभदा बागूल, टेट परीक्षार्थी मी २०० पैकी १९९ प्रश्न सोडवले होते. यासाठी रात्रंदिवस झटून अभ्यास केला होता. जास्त मार्क मिळवून पवित्र पोर्टलमार्फत नोकरी मिळेल, अशी आशा पल्लवित झाली होती. प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर धक्काच बसला. – प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन. परीक्षांच्या पूर्वी अनेक गुण वाढवून देऊ म्हणून एजेंट कॉल करत होते पण सढळ पुरावा मिळाला नसल्याने आम्ही शांत होतो पण आता हळूहळू हातात पुरावे लागत आहेत, लवकरच निकालावर कोर्टात जाऊ..! काही तरी गोडबंगाल आहे. मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले त्यांचे अभिनंदन… – कांबळे संदीप, अध्यक्ष. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना

Web Title: Pune students have made allegations over exam results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Exam
  • pune news
  • Student

संबंधित बातम्या

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…
1

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…

दिवाळी-छठपूजेमुळे Pune Railway स्थानकावर गर्दीचा महापूर! गर्दी नियंत्रणासाठी प्रशासान करणार ‘हे’ उपाय
2

दिवाळी-छठपूजेमुळे Pune Railway स्थानकावर गर्दीचा महापूर! गर्दी नियंत्रणासाठी प्रशासान करणार ‘हे’ उपाय

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
3

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक
4

छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.